भाजपचा राजकीय अजेंडा, आम्ही त्यांच्यासोबत असलो तरी.. सदाभाऊंनी काय ते सांगूनच टाकले !

Sadabhau Khot : ‘आज आम्ही जरी भाजपबरोबर असलो तर आम्ही सत्तेसाठी नाही तर शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आम्ही त्यांच्याबरोबर आहोत. त्यांचा राजकीय अजेंडा चालला आहे. आमचा अजेंडा मात्र शेतकरी, ग्रामीण भागातील जनता आणि त्यांच्या समस्या हा आहे. हाच अजेंडा पुढे घेऊन आम्ही चाललो आहोत. आमच्याच सरकारविरोधात आंदोलन केले तरी कधी देंवेंद्र फडणवीस, बावनकुळे यांचा फोन येत नाही. कारण त्यांनाही माहिती आहे की प्रश्न असला तर ही माणसं तो नेटाने चालवणार आणि कामाला लागणार’, अशा शब्दांत माजी राज्यमंत्री तथा शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी आपली राजकीय भूमिका विशद केली.

लेट्सअप मराठीच्या विशेष कार्यक्रमात लेट्सअप संपादक योगेश कुटे यांनी खोत यांची मुलाखत घेतली. यावेळी खोत यांनी विविध मुद्द्यांवर मते व्यक्त केली. जेव्हा तुम्ही आपल्याच सरकारच्या विरोधात आंदोलन करता त्यावेळी देंवेंद्र फडणवीस किंवा चंद्रशेखर बावनकुळे यांचा फोन येतो का ?, त्यांच्याकडून काही दबाव टाकला जातो का ?, असा प्रश्न विचारण्यात आला.

“इधर उधर की बात न करो, ये बताओ अदानी से आपका रिश्ता है क्या?”, ‘मन की बात’ वरून नाना पटोलेंचा मोदींना टोला

त्यावर खोत म्हणाले, ‘मला कधीही भाजपकडून अशी विचारणा कधी झाली नाही. कधीही माझ्यावर तसा दबाव आला नाही. कारण त्यांनाही माहिती आहे की प्रश्न असला तर ही माणसं तो नेटाने हाती घेतात आणि कामाला लागतात. पुणे महापालिकेत केलेल्या आंदोलनासंदर्भात मला स्वतः देवेंद्र फडणवीसांचा फोन आला होता. त्यांनी सांगितले की मी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत.’

‘आघाडी सरकारच्या काळात आम्ही सगळ्यात जास्त आंदोलन केली. आम्ही भाजपबरोबर होतो. त्यांचा त्यांचा राजकीय अजेंडा चालला आहे. आमचा अजेंडा शेतकरी, ग्रामीण भागातील जमता आणि त्यांच्या समस्या हा आहे. हाच अजेंडा घेऊन आम्ही पुढे चाललो आहोत. म्हणून मी आमच्या आंदोलनाला इंडिया विरुद्ध भारत असं नाव दिलं. कारण, आमचा हा संघर्ष इंडिया विरोधात आहे आणि तो भारतातील जनतेचा आहे.’

शेतकरी, कष्टकऱ्यांना कोण लुटतंय ?

‘कष्टकरी, शेतमजूर वर्ग, शेतकरी हा वर्ग गावात आहे आणि त्यांना लुटणारा खरा वर्ग हा शहरात आहे. याचा अर्थ माझा शहरातील मध्यमवर्गीय किंवा झोपडपट्टीत राहणाऱ्या माणसांवर आक्षेप आहे, असा आजिबात नाही. कारण, अनेक राजकीय नेते, मोठे अधिकारी स्थिरस्थावर झाले की ते मुक्काम कुठे ठोकतात तर इंडियात ठोकतात. मला असा एकतरी अधिकारी दाखवा ज्याने शेती घेतली आणि शेतीवर लोकांचे प्रबोधन करायला लागला, अस दिसत नाही. खरंच जर असा एखादा आयएएस अधिकारी असता तर तो शरद जोशी झाला असता.’

“इधर उधर की बात न करो, ये बताओ अदानी से आपका रिश्ता है क्या?”, ‘मन की बात’ वरून नाना पटोलेंचा मोदींना टोला

‘शरद जोशी स्वतः आंबेठाणला गेले. शेती घेतली. त्यानंतर त्यांना समजले की हा धंदा आतबट्ट्याचा आहे. तेव्हा मग त्यांना शेतीचं अर्थशास्त्र समजलं. आज या सगळ्या बाबूंना शेतीचं अर्थशास्त्र समजलंय का तर समजलंय पण, तेही लुटण्यात सामील झाले आहेत. कारण, कुणाला तरी लुटल्याशिवाय कुणाचा तरी खिसा गरम होऊ शकत नाही.’

इथेनॉलला परवानगी देण्याचा आग्रह आमचाच 

जेव्हा तुम्ही भाजपबरोबर गेलात तेव्हापासून तुमचे ऊस आंदोलन झाले नाही ज्यांनी एफआरपी थकवले, ज्यांचे कारखाने बुडाले अशांबरोबर तुम्ही दिल्लीवाऱ्या करता वस्तुस्थिती काय ? असा प्रश्न विचारला असता खोत म्हणाले, ‘आम्ही मंत्रिमंडळात होतो त्यावेळी आम्ही पहिल्यांदा साखरेची किंमत बांधून घेतली. इथेनॉलला परवानगी देण्याचा आग्रह आम्ही धरला. त्यापद्धतीने इथेनॉलचे धोरण ठरले.

आता जायचं कुणाबरोबर हा प्रश्न आहे. दगडापेक्षा वीट मऊ अशी आपल्याकडे एक म्हण आहे. आम्ही आज जरी भाजपबरोबर असलो तरी आम्ही सत्तेसाठी त्यांच्याबरोबर नाही तर आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी त्यांच्या बरोबर आहोत’, असे खोत यांनी स्पष्ट केले.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube