बंजारा अन् वंजारी एकच! नवा वाद पेटताच धनंजय मुंडेंनी आपली बाजू सेफ केली…

बंजारा अन् वंजारी एकच या विधानावरुन नवा वाद पेटताच आमदार धनंजय मुंडेंनी आपलं स्पष्टीकरण देत बाजू सेफ केली आहे.

Dhananjay Munde (4)

Dhananjay Munde : बंजारा आणि वंजारी समाज एकच असल्याचं विधान आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी बीडमधील मोर्चामध्ये केले होते. या विधानानंतर बंजारा समाजातील नेतेमंडळींकडून या विधानाचा कडाडून विरोध करण्यात आला. एवढंच नाही तर धनंजय मुंडे यांनी बंजारा समाजाची माफी मागण्याची मागणी जोर धरु लागली. अशातच माध्यमांनी केलेल्या सवालानंतर अखेर धनंजय मुंडे यांनी आपलं सेफ उत्तर दिलंय. बंजारा आणि वंजारी या दोन्ही वेगवेगळ्या जाती असून सर्व गोष्टी वेगळ्या आहेत. काही विघ्नसंतोषी मंडळींनी जाणूनबुजून माझ्या वक्तव्याचा वेगळा अर्थ काढून गैरसमज पसरवला असल्याचं स्पष्टीकरण धनंजय मुंडे यांनी दिलं आहे.

स्वातंत्र्यानंतरच्या आंदोलनांमध्ये कोणाचा हात? मंत्री अमित शाहांनी दिले ‘हे’ आदेश

धनंजय मुंडे यांनी बीडमधील काही गावांमध्ये पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केलीयं. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधलायं. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “वंजारा आणि बंजारा या दोन वेगवेगळ्या जाती आहेत आणि त्यांच्या सगळ्या गोष्टीही वेगळ्या आहेत. बीडमध्ये चांगला कार्यक्रम असताना काही विघ्नसंतोषी मंडळींनी जाणूनबुजून माझ्या वक्तव्याचा वेगळा अर्थ काढून गैरसमज पसरवला.” बंजारा समाजाचे स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्यावर पहिल्यापासून कायम प्रेम राहिले आहे. त्या प्रेमातूनच मी हे बोललो होतो. पण चुकीच्या घोषणा देणारे कोण आहेत, हे आता सोशल मीडियावर समोर येत असल्याचं धनंजय मुंडे म्हणाले आहेत.

आम्हाला अडकवून करकरेंना मारण्यामागे पवारांचाच हात; मालेगाव स्फोटातून निर्दोष सुटलेल्या चतुर्वेदींचे गंभीर आरोप

दरम्यान बीडमध्ये बंजारा समाजाने एस.टी. आरक्षणाच्या मागणीसाठी विराट मोर्चा काढला होता. या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित असलेल्या धनंजय मुंडे यांनी भाषण करताना ‘वंजारा आणि बंजारा एक आहोत’ असे विधान केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर बंजारा समाजाने तीव्र आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली.

मुंडेंच्या या विधानानंतर ज्येष्ठ साहित्यिक पंजाबराव चव्हाण म्हणाले, धनंजय मुंडे यांचं वक्तव्य चुकीचं आहे. वजारींचे सामाजिक, सांस्कृतिक मूल्य, बंजारा समाजापासून वेगळे आहे. बंजारा आणि वंचारी यांच्यात रोटी,बेटी व्यवहार होत नाही. दोन्ही जातींच्या बोलीभाषा वेगळ्या आहेत. वंजारी आणि बंजारा समाजाचा पेहराव वेगळा असून धनंजय मुंडे यांनी चुकीचं वक्तव्य करुन आरक्षणाचा लढा कमकुवत करु नये, असं चव्हाण म्हणाले आहेत.

जमिनी पाण्याखाली, जनावरं-गाड्या गेल्या वाहून! पावसाचा धोका पुन्हा वाढला, आज 33 जिल्ह्यांना अलर्ट

follow us