आम्हाला अडकवून करकरेंना मारण्यामागे पवारांचाच हात; मालेगाव स्फोटातून निर्दोष सुटलेल्या चतुर्वेदींचे गंभीर आरोप

Malegaon Bomb blast तील निर्दोष सुटलेल्या सुधाकर चतुर्वेदी यांनी स्फोट आणि 26/11 च्या हल्ल्यविषयी बोलताना शरद पवारांवर गंभीर आरोप केले.

Malegaon Bomb Blast

Malegaon Bomb blast innocent accused Sudhakar Chaturvedi Aaligations on Sharad Pawar : गेल्या काही दिवसांपूर्वी मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींना निर्दोष सोडण्यात आलं आहे. त्यानंतर या आरोपींपैकी एक असलेले सुधाकर चतुर्वेदी यांनी मालेगाव स्फोट आणि 26/11 च्या हल्ल्यात शहीद झालेल्या हेमंत करकरेंच्या मृत्यू विषयी बोलताना शरद पवारांवर गंभीर आरोप केले.

काय म्हणाले सुधाकर चतुर्वेदी?

हेमंत करकरे जिवंत असते तर आम्ही खुप अगोदरच मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून सुटलो असतो. 26/11 च्या हल्ल्यात करकरे यांचं खून झाला. कारण सर्वोच्च न्यायालायच्या निर्णयामध्ये नमुद करण्यात आलं आहे की, करकरे हे कसाबच्या रायफलने मारले गलेले नाही. मग त्यांना कुणी मारलं? त्याचं जॅकेट, मोबाईल सीडीआर अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे केस उलगडलेली नाही. तसेच करकरेंना कॉंग्रेसने मारलं आहे. शरद पवारांना हे सगळं माहिती आहे. कारण आमची सगळी केस त्यांच्या हातात होती. त्यावेळी गृहमंत्री कृपाशंकर सिंग, नवाब मलिक, शरद पवार यांनी या प्रकरण हाताळलं. त्यात करकरे यांच्यावर दबाव होता.

‘सखाराम बाईंडर’ पुन्हा रंगमंचावर! अभिनेत्री नेहा जोशी ‘लक्ष्मी’च्या भूमिकेत

तसेच सोलापूर न्यायालयात एका एटीएस अधिकाऱ्याचं स्टेटमेंट आहे की, आम्हाला मोहन भागवतांना बदनाम करण्यासाठी पाठवलं आहे. पण मी गेलो नाही. त्यामुळे त्याला सस्पेंड केलं गेलं. तसेच त्यांनी सांगितलं की, मालेगाव स्फोटातील मुख्य आरोपी डांगेचं 26/11 ला एन्काऊंटर करून तो फारर असल्याचं सांगण्यात येत आहे. दुसरीकडे करकरे यांनी मालेगाव प्रकरणाचा तपास पुढे नेण्यास नकार दिला होता. ते म्हणाले होते की, यामध्ये काहीही नाही. सर्व आरोपी निर्दोष सुटणार आहेत. त्यामुळे करकरेंना मारलं गेलं. त्याचे माझ्याकडे पुरावे आहेत.

अंजली दमानिया यांच्या पतीची ‘मित्रा’ संस्थेत नियुक्ती; रोहित पवारांची टीका, दमानियांनी काय उत्तर दिलं?

तसेच ते पुढे म्हणाले की, एटीएसला देखील ही माहिती आहे की, माझ्या घरामध्ये पोलिसांनीच आरडीएक्स ठेवलं होतं. तो अधिकारी बगाडे अद्यापही पदावर आहे. त्याबाबत त्याची चौकशी देखील केली गेली नाही. मालेगाव आणि 26/11 चा हल्ला कनेक्टेड आहे. जर आम्ही जेलमध्ये नसतो तर 26/11 चा आरोप देखील आमच्यावरच आला असता. या सर्वांच्या मागे 100 टक्के शरद पवार आहेत. त्यांना याबाबत कोण विचारेल? हे सगळं काळानुरूप समोर येईल.

follow us