मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर एल्विशसारख्या विषारी नशाबाजांचा सुळसुळाट; वडेट्टीवारांचा हल्लाबोल

Vijay Wadettiwar On CM shinde : युट्यूबर आणि बिग बॉस OTT 2 चा विजेता एल्विश यादव (Elvish Yadav) चांगलाच अडचणीत आला आहे. एल्विश यादवविरोधात नोएडामध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर क्लब आणि पार्ट्यांमध्ये विषारी सापाचे विष पुरवल्याचे आरोप आहे. एल्विशमुळं राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी थेट […]

मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर एल्विशसारख्या विषारी नशाबाजांचा सुळसुळाट; वडेट्टीवारांचा हल्लाबोल

Vijay Wadettiwar On CM shinde

Vijay Wadettiwar On CM shinde : युट्यूबर आणि बिग बॉस OTT 2 चा विजेता एल्विश यादव (Elvish Yadav) चांगलाच अडचणीत आला आहे. एल्विश यादवविरोधात नोएडामध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर क्लब आणि पार्ट्यांमध्ये विषारी सापाचे विष पुरवल्याचे आरोप आहे. एल्विशमुळं राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरच टीकास्त्र डागलं.

Prithvik Pratap: पृथ्वीक प्रतापने मुंबईत खरेदी केले नवीन अलिशान घर; फोटो शेअर… 

एल्विश यादववर गुन्हा दाखल झाल्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. कारण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एल्विश यादवला यंदाच्या गणेश उत्सवादरम्यान वर्षा बंगल्यावर येण्याचं निमंत्रण दिलं होतं. वट्टेटीवार यांचे एकनाथ शिंदे आणि एल्विशचे फोटो ट्वीट करत मुख्यमंत्र्यावर निशाणा साधला. या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिलं की, मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर एल्विश यादव सारख्या विषारी नशाबाजांचा सुळसुळाट… शाल नारळ देऊन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आदरतिथ्य!

त्यांनी लिहिलं की, गणपती पूजनाच्या निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्या एल्विश यादवला शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर बोलावून आदरतिथ्य केले होते. त्याला सापाच्या विषापासून ड्रग्स बनवणे, सेवण करणे आणि विकणे यासारख्या गंभीर गुन्हा दाखल कऱण्यात आला.

महिलांबद्दल अपशब्द वापरणारा, विषारी ड्रग्सचे सेवन विक्री करणाऱ्या आरोपीचे आदरतिथ्य करून मुख्यमंत्री एल्विश यादव सारख्या नशाबज तरुणांना राज्यातील तरुणांचे रोल मॉडेल बनवण्यात हातभार लवात आहे का? असा सवाल त्यांनी केला.

आधीच राज्यात ड्रग कारखाने सापडत आहेत, ललित पाटील शासकीय पाहूणचार झोडतो. मग पळवून लावला जातो आणि इथे वर्षावरतर नशाबाज आरती करतो हे आहे महायुती सरकार, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.

काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनीही ट्विट करत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान गुन्हेगारांचे पर्यटनस्थळ झाले आहे का? यापूर्वी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पुण्यातील कुख्यात गुंड बाबा बोडकेंचे वर्षा बंगल्यावरील फोटो आले होते. अरे कुठे नेऊन ठेवलाय माझा महाराष्ट्र?, असा टोला लोंढे यांनी लगावला.

Exit mobile version