Download App

देसाईंचा लोढावर हल्ला : ही काय बिल्डिंगची स्कीम नाही की ज्याला तुम्ही नद्यांची नावे देताय…

Trupti Desai : राज्याचे महिला बालकल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधवा महिलांना गंगा, भागीरथी हे शब्द वापरावेत अशा पद्धतीचा प्रस्ताव पाठवलेला आहे. खरंतर विधवा महिलांचा प्रश्न ज्वलंत आहे, त्यांच्या वाट्याला आधीच भरपूर दुःख आलेलं असतं आणि त्यातच अशा पद्धतीने नद्यांची नावे पाठवणे म्हणजे विधवा महिलांची थट्टा केल्यासारखे आहे. यामुळे त्यांना समाजात ट्रोलसुद्धा केले जाऊ शकते, अशी टीका भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई यांनी भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यावर केली.

विधवा महिलांना गंगा भागीरथी म्हणावे असा प्रस्ताव मंगलप्रभात लोढा यांनी दिल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यावरून राज्यात विविध स्तरातून मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यावर टीका होत आहे. या प्रकरणात आता तृप्ती देसाईनी उडी घेतली आहे.

‘गंगा भागीरथी’ उल्लेखावरुन राष्ट्रवादीत विसंवाद, सुप्रिया सुळे-रुपाली चाकणकर आमने समाने – Letsupp

तृप्ती देसाई म्हणाल्या की, मंगलप्रभात लोढा हे बांधकाम व्यावसायिक आहेत आणि म्हणूनच बिल्डिंगची स्कीम करताना नद्यांची नावे अनेक वेळा दिली जातात, त्यामुळे मला त्यांना सांगायचे आहे की,” ही काय बिल्डिंगची स्कीम नाही, ज्याला तुम्ही नद्यांची नावे देणार आहात” हा विधवा महिलांचा ज्वलंत प्रश्न आहे, अशी थट्टा करण्यापेक्षा विधवा महिलांचे अनेक योजना ज्या रखडले आहेत, त्या मार्गी लावल्या पाहिजेत. त्यांच्या सन्मानासाठी अनेक कामे कृतीत केली पाहिजेत आणि गंगा, भागीरथी ही नावे ताबडतोब तुम्ही रद्द केली पाहिजे.

Tags

follow us