तुकाराम मुंढेंच्या कारभारावर आता संशय; सत्ताधारी वळसे, विखेंची विरोधात भूमिका

Tukaram Mundhe: सुरुवातीला राज्यातील मंत्र्यांनी, आमदारांनी मुंढेच्या कारभारचे तोंडभरून कौतुक केलं होतं. पण याच कारभारावर आता सत्ताधारी नेत्यांनी बोट ठेवलंय.

Sujay Vikhe Dilip Walse

Sujay Vikhe Dilip Walse

Tukaram Mundhe FDA Maharashtra Action : अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांनी भेसळखोऱ्यांना जोरदार दणका दिलाय. अन्नातील भेसळ असो की दूधातील भेसळ मुंढेंच्या नेतृत्वाखालील एफडीएचे अधिकारी कुणालाच सोडत नाही. राज्यभरात भेसळयुक्त, बनावट दूधाचे रॅकेट उघडकीस येतंय. नित्कृष्ट दूधाचे टँकर नदी-नाल्यांमध्ये ओतून दिले जात आहेत. त्यामुळे तुकाराम मुंढे लोकांच्या मनात ते हिरो ठरले. तर काही जणांसाठी तुकाराम मुंढे हे ‘विठ्ठल’ झाले. डेअऱ्यांना येणाऱ्या बनावट दूध बंद झाले. सुरुवातीला राज्यातील मंत्र्यांनी, आमदारांनी मुंढेच्या कारभारचे तोंडभरून कौतुक केलं होतं. पण याच कारभारावर आता सत्ताधारी नेत्यांनी बोट ठेवलंय. एफडीएच्या कोणत्या आदेशामुळे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आलाय. सत्ताधारी राष्ट्रवादीचे आमदार दिलीप वळसे पाटील (Dilip Walse) माजी खासदार डॉ. सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी एफडीए विरोधात भूमिका का घेतलीय.

फॅट आणि एसएनएफच्या आदेशावर वळसेंचे बोट
दूध भेसळ, बनावट दूध निर्मितीवर कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिका आमदार दिलीप वळसे पाटील व माजी खासदार सुजय विखे पाटील यांची आहे. परंतु सरसकट कारवाईला दोघांनी विरोध दर्शविला आहे. आमदार दिलीप वळसे पाटील यांचे म्हणणे आहे. राज्यात राज्याचा आणि केंद्राचा दोन एफडीए विभाग कार्यरत आहे. दोघांचे वेगळे नियम आहेत. शेतकऱ्यांनी आणलेले जसेचे तसे दूध संकलन केंद्राने स्वीकारले पाहिजे. पण बाहेरच्या मार्केटमध्ये जसेतसे दूध पाठवता येणार नाही. दर्जेदार दूध देण्याची जबाबदारी प्रोसेस करणाऱ्या कंपनीची आहे. भेसळयुक्त, कमी प्रतीचे दूध नागरिकांना देऊ नये, असे केंद्राच्या एफडीए विभागाचा नियम आहे. दूधाची फॅट 3.2 आणि एसएनएफ 8.3 असेल तर दूध संकलन केंद्राने दूध स्वीकारावे, असा एफडीएने आदेश दिला आहे. बागायती भागात कोरडा चारा नसतो, त्यामुळे दूधाची फॅट कमी भरते, असे मत वळसे पाटील यांचे आहे. त्यामुळे राज्यातील दूध संकलन घटल्याचा मुद्दा वळसे पाटील यांनी उपस्थित केलाय.

कोणत्या दूध उत्पादकांची अडचण ?
काही दूध संकलन केंद्राचे तेच मत आहे. बागायती भागामध्ये खूप गायी असणारे शेतकरी आहेत. त्यांना कोरडा चारा मिळत नाही. तो खूप महाग आहे. त्यामुळे तो आपला शेतातील ओला चारा वापरतो. त्यातून दूधाची फॅट कमी होते. तर एखाद्या शेतकऱ्यांकडे एक दोनच गायी असतील आणि दोघींची फॅट कमी असेल तर त्याचे दूध संकलन केंद्र स्वीकारू शकत नाही. त्यामुळे अडचण निर्माण होत आहे. त्यात गायी वेल्यावर कमी फॅट लागते आणि एसएनएफ जास्त असते. ही अडचण आहे. त्यामुळे या नियमामुळे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहे. सरसकट दूध संकलन केल्यानंतर सगळ्या दूधाची एकत्रित फॅट नियमानुसार लागते, असे दूध संकलन चालकांचे म्हणणे आहे. पण दूध उत्पादकांनिहाय हा नियम लावल्यास मात्र दूध उत्पादक अडचणीत येणार आहेत.

चुकीच्या पंचनाम्यांमुळे शेतकऱ्यांवर अन्याय..विखेंची भूमिका
सुजय विखे यांनीही एफडीएच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. कोणतीही कारवाई करण्यापूर्वी प्रशासनाने सखोल पडताळणी करणे आवश्यक आहे. चुकीच्या पंचनाम्यांमुळे किंवा एकतर्फी कारवाईमुळे प्रामाणिक दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे असल्याचे सुजय विखेंची भूमिका आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या कारवायांना मिळत असलेल्या प्रसिद्धीवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा दूध भेसळीवर कारवाई केली जात आहे, असे मांडले जात आहे. यापूर्वीही संबंधित अधिकारी अशा कारवाया करत होते. मात्र, आता अचानक या कारवायांना एवढी प्रसिद्धी का मिळत आहे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

Exit mobile version