Download App

फडणवीस, हे दृश्य पाहून तुम्हाला लाज वाटायला पाहिजे; नेरळमधील घटनेवरून राऊत संतापले

  • Written By: Last Updated:

Sanjay Raut : शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे (Mahendra Thorve) यांच्या अंगरक्षकाने एका व्यक्तीला नेरळमध्ये बेदम मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये थोरवे यांचा अंगरक्षक असलेला शिवा नावाचा व्यक्ती कारमधील व्यक्तीला लोखंडी रॉडने मारहाण दिसत आहे. त्यावरून विरोधकांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली. आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनीही (Sanjay Raut) या घटनेवरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली.

ऐन विधानसभेपूर्वी भाजपला मोठा धक्का, भास्करराव पाटील खतगावकरांची कॉंग्रेसमध्ये घरवापसी होणार! 

या मारहाणीचा व्हिडिओ संजय राऊतांनी एक्स अकाऊंटवर शेअर केला. या व्हिडिओमध्ये थोरवेंचा अंगरक्षक शिवा कारमध्ये बसलेल्या व्यक्तीला बेदम मारहाण करताना दिसत आहे. त्यावेळी गाडीत त्या व्यक्तीची बायको, मुलं देखील होती. त्यांचे रडण्याचे आवाज ऐकू येत आहेत. राऊतांनी लिहिलं की, गृहमंत्री फडणवीस, हे दृश्य पाहून तुम्हाला लाज वाटली पाहिजे. काय अवस्था केलीये तुम्ही या महान राज्याची? अशा शब्दात त्यांनी फडणवीसांवर निशाणा साधला.

खासदार डॉ. शिवाजी काळगेंना मोठा दिलासा, जात वैधता प्रमाणपत्रावर आक्षेप घेणाऱ्या याचिका फेटाळल्या… 

गुडांचा म्होरक्याच बेकायदेशीरपणे मुख्यमंत्रीपदावर…
ठाकरे गटाने लिहिलं की, महाराष्ट्रात गुंडाराज! मिंधेंच्या आमदाराच्या, महेंद्र थोरवे ह्यांच्या शिवा नावाच्या बॉडीगार्डाने नेरळ येथे भर दिवसा, भर रस्त्यात एका व्यक्तीला मारहाण केली. त्या व्यक्तीची बायकां मुलं रडत होती, पण कोणी मदतीला यायची हिम्मत केली नाही. कायद्याच्या चिंधड्या, लोकांचे हाल! ही फक्त कर्जतची व्यवस्था नाही, राज्यभरात गुंडगिरी वाढलीये. कायदा- सुव्यवस्थेची वाट लागलीये! कारण, गुंडांचा म्होरक्याच बेकायदेशीरपणे मुख्यमंत्रीपदावर बसलाय, असं ठाकरे गटाने म्हटलं.

आमदार थोरवे काय म्हणाले?
हे कार्यकर्त्यांमध्ये आपआपसात झालेले मतभेद आहेत. त्याच्याशी माझा संबंध नाही. मारहाण करणारा व्यक्ती माझा अंगरक्षक नाही, ते असंच सांगत असतात. ज्याला मारहाण करण्यात आली, आणि ज्याने मारहाण केली, ते दोघेही आमच्याच पक्षाचे आहेत. त्यांच्यात आपआपसात मतभेद झालेत. नेमकं काय झालं, याबाबत मला कल्पना नाही. मी दर्शनासाठी आलो होतो, आता जाऊन माहिती घेईन. आम्हाला सत्तेत मस्ती वगैरे नाही, आम्ही आमचं काम करत आहे. ठाकरे गट त्याचं भांडवल करत आहेत, असं थोरवे म्हणाले.

follow us