Uday Samant : विधानसभा निवडणुकीत दारुण पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर ठाकरे गटाला (UBT) अंतर्गत घरघर लागल्याचे चित्र आहे. माजी आमदार राजन साळवी Rajan Salvi) हे ठाकरे गटात नाराज असल्याचं बोललं जातयं. तर काही दिवसांपूर्वी भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी शिवसेना (ठाकरे) पक्ष जवळजवळ काँग्रेस (Congress) झालाय, असं विधान करत उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) घरचा आहेर दिला होता. त्यांच्या या विधानानंतर ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा सुरू झाली. अशातच आता मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी सूचक भाष्य केलं आहे.
सैफ खान हल्ला प्रकरणात मंत्री कदमांचा मोठा खुलासा; म्हणाले, “विरोधी पक्षांनी…”
पुढील ८ दिवसांत शिंदे गटात मोठा पक्ष प्रवेश होणार आहे, असं विधान सामंत यांनी केलं.
रत्नागिरी येथे उदय सामंत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी सावंत यांनी कोकणातील राजकीय घडामोडींवर देखील भाष्य केलं. ते म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री १८ तारखेला दावोसच्या दौऱ्यावर आहेत. मी १९ तारखेला दावोसला जाईन. २४ तारखेला दावोसहून परत येईन. येत्या २४ तारखेपर्यंत आपण वाट पहावी. आपल्याला अपेक्षित असलेला आणि जनतेला अपेक्षित असलेला असा शिवसेना ठाकरे गटातून पुढच्या ८ दिवसांत शिंदे गटात मोठा पक्षप्रवेश होणार आहे, असा गौप्यस्फोट सामंत यांनी केला.
Dhananjay Deshmukh : ‘…म्हणून मी आज जबाब नोंदवणार नाही’, धनंजय देशमुखांनी स्वतः सांगितलं कारण
संगमेश्वर आणि रत्नागिरीमधील प्रवेश असतील का, असा सवाल केला असता सामंत म्हणाले की, मी दोन दिवसांपूर्वी सांगितलं होतं, महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा प्रकारे बदलली आहे. आम्हाला गद्दार म्हणणाऱ्यांना आता वाटतं की, आम्हीच बरोबर होता. ठाकरे गटातील लोकांना आता कोण बरोबर आणि कोण चूक होतंय, याची जाणीव झाली आहे. त्यामुळं ते लोक आता आमच्याकडे येत आहे. रत्नागिरीबद्दल बोलयाचं झालं तर ठाकरे गटाची ज्या पद्धतीने कॉंग्रेस झाली, तीच परिस्थिती ठाकरे गटाची या जिल्ह्यात झालेली दिसणार आहे, असं सामंत म्हणाले.
दरम्यान, कोकणातील काही नेते नाराज असले तरी उद्योगमंत्री सामंत यांनी कोणाचेही नाव घेतलेले नाही. त्यामुळे शिंदे सेनेच्या गळ्याला लागलेला कोकणातील बडा नेता कोण, हेच पाहणं महत्वाचं आहे.