Download App

Uday Samant : CM शिंदेंच्या आमदारांना मंत्रीपद मिळणार? सामंतांचं ‘पॉझिटिव्ह’ उत्तर

Uday Samant : राज्यात जुलै महिन्यात अनपेक्षित घटना घडल्या आणि अजित पवार थेट सरकारमध्येच दाखल झाले. त्यांनी नुसतीच (Uday Samant) एन्ट्री घेतली नाही तर स्वतःसह आठ आमदारांना वजनदार मंत्रीपदेही मिळवून दिली. मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन शिंदे गटातील आणखी काही आमदारांना मंत्रीपदे मिळणार असल्याची चर्चा सुरू असतानाच या घडोमोडी घडल्या. त्यामुळे शिंदे गटातील आमदारांची नाराजी उफाळून आली. शिंदे गटातील आमदार भरत गोगावले (Bharat Gogawale) कमालीचे नाराज झाले. कारण, त्यांना मंत्रीपद मिळेल याची खात्री होतीच. परंतु, तरीही त्यांना डावलण्यात आले. यानंतर त्यांनी आमच्यासारख्यांच्या जीवावर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री झाले असे वक्तव्य केलं होतं.

दरम्यान, आता पुन्हा गोगावलेंना मंत्रीपद मिळेल असा दावा केला जात आहे. यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी देखील अशीच इच्छा बोलून दाखवल्याने राजकारणात चर्चा सुरू झाल्या आहेत.

Maratha Reservation : मराठ्यांनो, छगन भुजबळला ताकद देऊ नका; जरांगे पाटलांनी साधला निशाणा

मंत्री सामंत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भरत गोगावले यांच्या मंत्रीपदावर भाष्य केले. ते म्हणाले, भरत गोगावले मंत्री झाले पाहिजेत ही माझीही प्रामाणिक इच्छा आहे आणि तो योग लवकरच येईल. गोगावले हे आमचे सहकारी आहेत. त्यांचं मन खूप मोठं आहे. हे मी अनेकवेळा सांगितलंही आहे. ते आमचे मुख्य प्रतोद आहेत. आज गोगावले मंत्री नसले तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे त्यांच्याव विशेष प्रेम आहे. आम्ही जरी मंत्री असलो तरी गोगावले स्वतः मंत्री असल्यासारखे आमच्याकडून काम करून घेतात. परंतु, गोगावले मंत्री झाले पाहिजेत ही माझी प्रामाणिक इच्छा आहे आणि तो योग लवकरच येईल, असे वाटते.

सर्वांना चांगली खाती मिळतीलच असं नाही; NCP च्या खातेवाटपावर उदय सामंतांचे मोठे विधान

सामंतांच्या ‘त्या’ वक्तव्याची आठवण

अजित पवार सोबत आल्याने आता शिवसेना आणि भाजपची थोडी थोडी खाती कमी होणार हे स्वभाविकच आहे. कारण तिसरा पक्ष सोबत आल्याने शिवसेना, भाजपला तडजोड करावीच लागणार आहे. आमचे महामंडळाचे वाटप तयार होते. पण अजितदादा आल्याने आता नव्याने आखणी करावी लागणार आहे, असे उदय सामंत यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते.

Tags

follow us