Maratha Reservation : मराठ्यांनो, छगन भुजबळला ताकद देऊ नका; जरांगे पाटलांनी साधला निशाणा
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी (Maratha Reservation) उपोषण करून संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आलेले मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. जरांगे पाटील यांनी राज्याचा दौरा सुरू केला आहे. दौऱ्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी ते हिंगोली जिल्ह्यात दाखल झाले आहेत. येथे आल्यानंतर त्यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना निशाण्यावर घेत जोरदार टीका केली. मराठा समाजाने छगन भुजबळला बळ देण्याचं काम करू नये, असे जरांगे पाटील म्हणाले.
Ambadas Danve : माहिती असेल तर पुरावे द्या! दानवेंनी वडेट्टीवारांना दिलं चॅलेंज
हिंगोली येथे मराठा आंदोलकांची (Maratha Reservation) भेट घेण्यासाठी जरांगे पाटील येथे आले होते. ते पुढे म्हणाले, अनेक जातींतल्या पोटजातींनाही आरक्षण दिले गेले आहे. तर मराठा ही जात कुणबींच्या पोट जातीचा घटक होऊ शकणार नाही का, असा सवाल त्यांनी केला. यासाठी कोणत्याही कागदपत्रांची गरज लागणार नाही. फक्त राजकीय इच्छाशक्तीची गरच आहे. मात्र, मागील 70 वर्षांपासून ही राजकीय शक्तीच आपल्याकडे नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
सरकारने कोणतेही बहाने न करता आता कुणबी जातीचे दाखले द्यावेत. विशेष म्हणजे, पाच हजार पुरावे सापडले आहेत. त्यामुळे सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावे. पोटजात म्हणून बऱ्याचशा जाती राज्यात आरक्षणाचा लाभ घेत आहेत. मग, मराठा ही कुणबींची पोटजात होऊ शकत नाही का असा सवाल करत त्यांनी पुन्हा एकदा आरक्षणाची मागणी केली. सरकारला पुराव्याचा आधार पाहिजे होता. आता पाच हजार पुरावे सापडले आहेत. या पुराव्याच्या आधारावर तुम्ही राज्यातील मराठा समाजाला सरसकट कुणबी जातीचे दाखले देऊ शकता. आता काही बहान सांगण्याची गरज नाही, असे जरांगे पाटील म्हणाले.
“बनवाबनवी चालणार नाही, मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण” : जरांगेंनी आशिष देशमुखांना फटकारले
आता कोणता मराठा ओबीसीत यायचा राहिलाय ?
यानंतर जरांगे पाटील यांनी ओबीसी आरक्षणावरही भाष्य केले. मराठा समाजाला कुणबी दाखले दिल्यास संख्या प्रचंड वाढेल. म्हणजेच पाच कोटी मराठा समाज ओबीसीत येईल. पण, ओबीसी आरक्षणात यायचा कुठला मराठा राहिला आहे. विदर्भ, खानदेशातील सगळा मराठा आरक्षणात गेलाय. पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक विभाग ओबीसीत येतोय. कोकणचाही काही भाग ओबीसीत येतोय. मग, आता कोणता मराठा राहिला आहे तर मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रातला. आम्ही काय पाप केलंय? तुम्ही कसं म्हणू शकता की सरसकट आरक्षण देऊ नका?, असे सवाल जरांगे पाटील यांनी केले.