मुंबई : दावोस परिषदेसाठी (Davos Conference) सरकारने चाळीस कोटी खर्च केला, असा आरोप आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केलाय. त्या खर्चाचा हिशोब द्यायला आम्ही तयार आहोत, असं प्रतिआव्हान उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी केलंय.
आम्ही दावोसच्या ट्रीपबद्दल आभ्यास केला. त्यावरुन असं कळून येतं. तिथं महाराष्ट्र सरकारचा जो अधिकृत कार्यक्रम होता. तो चार दिवसांचा असावा असं वाटतं. म्हणजे 16 ते 20 दरम्यान ठरला होता. अंदाजे खर्च 35 ते 40 कोटी आहे जो अजून वाढू शकतो.
चार दिवसांसाठी 40 कोटी खर्च आपण गृहित धरला तर सरासरी दररोज 10 कोटीच्या आसपास झाला. सरकारमधल्या लोकांना खर्च कसा दाखवायचा हे योग्य रीतीने माहिती असतं, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला होता.
त्यांच्या आरोपांना उत्तर देताना उदय सामंत म्हणाले, ज्याला कोणाला याबद्दल माहिती आहे त्यांनी पुराव्यानिशी सादर करावा. जो खर्च झाला आहे त्याला बोर्डात मान्यता दिली आहे. कोणीही कोणाच्या मित्र परिवाराला एकही एमआयडीचा खर्च केला नाही. जो कोणी याबद्दल टीका करील त्याला आम्ही उत्तर देऊ, असे उदय सामंत म्हणाले.
जो काही खर्च झालाय तो मागच्या वर्षीपेक्षा जास्त झालाय हे नक्की. अंदाजे 32 ते 33 कोटी खर्य झालाय. तो कशासाठी झालाय तर पॅव्हेलियनचा खर्चच 14 कोटी झालाय. तिथं जो खर्च झालाय त्याचे डिटेल्स आमच्याकडे आहेत, असे उदय सामंत म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दावोस दौऱ्यावर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी घणाघाती टीका केली होती. अव्वाच्या सव्वा पैसा वापरला गेला. चार दिवसांचा खर्च तब्बल 35 ते 40 कोटी एवढा होता. चार्टर विमानाने जाऊनही ते उशिरा पोहचले. त्यामुळे महाराष्ट्रासाठीच्या बैठका रद्द झाल्या, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला होता.