उदय सांमत म्हणाले… जो सन्मान पवारांना दिला जातो तोच उद्धव ठाकरेंना दिला जावा

Uday Samant to Uddhav Thackeray : शिवसेनेतील फुटीनंतर शिंदे गट व ठाकरे गट निर्माण झाला. आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जात भाजपसोबत सत्ता स्थापन केली. काँग्रेस – राष्ट्रवादी सोबत युती नको अशी भावना शिंदे गटाने वेळोवेळी व्यक्त केली आहे. यावर बोलताना मंत्री उदय सामंत म्हणाले, काँग्रेस – राष्ट्रवादी हे आपल्या युतीतील नाही. उद्धव ठाकरेंचे स्थान महाराष्ट्राच्या […]

Untitled Design   2023 05 15T153855.087

Untitled Design 2023 05 15T153855.087

Uday Samant to Uddhav Thackeray : शिवसेनेतील फुटीनंतर शिंदे गट व ठाकरे गट निर्माण झाला. आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जात भाजपसोबत सत्ता स्थापन केली. काँग्रेस – राष्ट्रवादी सोबत युती नको अशी भावना शिंदे गटाने वेळोवेळी व्यक्त केली आहे. यावर बोलताना मंत्री उदय सामंत म्हणाले, काँग्रेस – राष्ट्रवादी हे आपल्या युतीतील नाही. उद्धव ठाकरेंचे स्थान महाराष्ट्राच्या राजकारणात मोठंच असलं पाहिजे. मात्र कालच्या बैठकीत त्यांना ते स्थान देण्यात आले नाही. जो सन्मान शरद पवार यांना दिला जातो तोच मान सन्मान उद्धव ठाकरेंना दिला जावा, ही आमची अपेक्षा होती असे सामंत म्हणाले.

दरम्यान नुकतेच महाविकास आघाडीची बैठक पार पडली होती. या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, भाई जगताप, सुप्रिया सुळे, संजय राऊत यांच्यासह अनेक नेतेमंडळी व कार्यकर्ते उपस्थित होते. मात्र यावेळी शरद पवार हे वेगळ्या खुर्चीवर बसल्याचे दिसले. तर उद्धव ठाकरेंसह इतर सर्वजण सोफ्यावर बसले होते.

मविआच्या बैठकीत उद्धव ठाकरेंना महत्वाचे स्थान दिले जात नसल्याचा खोचक टोला मंत्री उदय सामंत यांनी लगावला आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले, ठाकरे गटाचे पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश होत आहे. आपले राहिलेले इतर आमदार कोठे जाऊ नये, तसेच आमचं गठबंधन मोठे आहे हे दाखवण्यासाठी मविआने बैठक घेतली. मात्र जे पाहायला नको तेच पाहायला मिळते आहे.

कोणाच्याही मनासारखा निर्णय घेणार नाही, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी ठणकावलं…

आमच्यासाठी महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरे यांचे स्थान अत्यंत मोठे आहे, असं समजणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. जो मान सन्मान आदरणीय शरद पवार यांना दिला जातो तोच मान सन्मान उद्धव ठाकरे यांना दिला जावा ही आमची अपेक्षा होती. आमचा नेता मोठा व्हावा ही इच्छा एकनाथ शिंदे यांची आहे.

तसेच काँग्रेस व राष्ट्रवादी हे आपल्या नैसर्गिक युतीमधील घटक नाही. युतीतला भाजप हा आपला पक्ष आहे आपण त्यांच्यासोबत जाऊया हे जर सांगितलेले कोणी खोटं ठरवत असेल तर त्याचे परिणाम काय झाले हे कालच्या महाविकास आघाडीच्या बैठकीतून दिसून आले आहे.

Exit mobile version