Download App

‘गुवाहाटीत टेबलवर नाचायला पैसे पण, औषधांसाठी नाही’; नांदेड मृत्यूप्रकरणी उद्धव ठाकरे संतापले

Uddhav Thackeray : नांदेड येथील सरकारी रुग्णालयात (Nanded Hospital Deaths) झालेल्या रुग्णांच्या मृत्यू्वरून राज्यातील वातावरण तापले आहे. विरोधकांनी सरकारवर तुफान टीका सुरू केलेली असतानाच आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही सरकारवर हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज पत्रकार परिषदेत सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले तसेच रुग्णालयातील बळी हे भ्रष्टाचाराच्या साथीचे बळी आहेत, असा आरोप केला.

ठाकरे पुढे म्हणाले, आज मी जरा अस्वस्थ आहे. सध्या राज्यातील आरोग्य यंत्रणेचे तीन तेरा वाजलेत. हे पाहिल्यानंतर चीड येते. आज मी मुख्यमंत्री नाही. महाविकास आघाडीचं सरकार नाही. पण, आरोग्य व्यवस्था तीच आहे. कोरोना सारख्या संकटाचा सामना केला. त्याच आरोग्य व्यवस्थेतचे तीनतेरा वाजलेत. गुवाहाटीत टेबलवर नाचायला पैसे आहेत, मजामस्ती करायला पैसे आहेत पण, औषधासाठी पैसे नाहीत. रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी पैसे नाहीत, त्यामुळे या प्रकाराची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही उद्धव ठाकरेंनी केला. सरकारकडे औषधांसाठी पैसे नाही म्हणत पण, परदेश दौरा सुरू आहे. जाहिरातबाजी करण्यासाठी सरकारकडे पैसा कुठून येतोय, असा सवाल त्यांनी केला.

Sanjay Raut : महाराष्ट्रात यमाचा रेडा फिरतोय, अन् त्यावर.. राऊतांची जळजळीत टीका

एक फुल एक हाफ दिल्लीत, दुसरा हाफ कुठे ?

कोरोना काळात मुंबई मॉडेल असेल, दुर्गम भागात औषधे पुरवली. ड्रोनद्वारेही औषधे दिली. मी स्वतः दुर्गम भागात भेटी दिल्या. या संकटात अनेक डॉक्टर-नर्सचा मृत्यू झाला. पण, आज मात्र त्यांना बदनाम केलं जातंय. ठाणे हॉस्पिटल असेल दुर्घटना घडताहेत, मुख्यमंत्री कुठे आहेत. एख फूल दोन हाफ कुठे आहेत. मुख्यमंत्री दिल्लीत आहेत. एक फूल, एक हाफ दिल्लीत आहे. दुसरा हाफ कुठे आहे, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

Tags

follow us