MVA Vajramuth Sabha : मी येत्या 6 तारखेला बारसूला जाणार आणि त्या टिकाणी बोलणार, तुम्ही मला कोण अडवणारे? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला केला आहे. महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) वज्रमूठ सभा मुंबईतील बीकेसी (BKC) मैदानावर झाली. यावेळी बारसूल्या लोकांना मी भेटणार त्यांच्याशी बोलणार असं सांगत उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांचं आव्हान स्विकारले आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की बारसू म्हणजे पाकव्याप्त काश्मिर नाहीय. माझ्या महाराष्ट्रातल्या रात्नागिरीतला भाग आहे आणि मी जाणार. 6 तारखेला प्रथम मी बारसूला जाणार आहे. बारसूत माझ्या नावाने पत्र दाखवत आहेत. उद्धव ठाकरेंनी ही जागा सुचवली. हो दाखवली पण त्या पत्रात असं लिहिलं का पोलीस घुसवा, वेळप्रसंगी गोळ्या चालवा आणि रिफायनरी करुन दाखवा असं लिहिलं आहे का? माझं पत्र तिकडं नाचवत असाल तर जेव्हा महाविकास आघाडीचे सरकार होते तेव्हा हे काय म्हणत होते की राष्ट्रवादी दादागिरी करत आहे. पवार साहेबांच्या आमलाखाली गेले आहेत. पण उदय सामंत पवारसाहेबांना भेटून आलेत. म्हणजे तुम्ही गेलात तर चालतं? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला आणि एकनाथ शिंदे यांना केला आहे.
‘तुमच्या टिनपाटांना बुचं लावा, अन्यथा जशाच तसे…’ उद्धव ठाकरेंचा इशारा
शिवसेना प्रमुखांनी ज्यावेळी शिवसेनेची स्थापना केली त्यावेळी ह्यांचा कुठं थांगपत्ता नव्हता. आणि आज ही शेफारलेली लोकं मला बाळासाहेब शिकवत आहेत. त्यांना मला सांगायचं आहे तुम्ही कधी बाळासाहेबांना भेटला देखील नव्हता पण स्व:ता शरद पवार यांच्याकडे गेले. काय करु? काय करु? आता का सल्ला घेता तुम्ही? बारसूचं पत्र मी दिलं म्हणून तुम्ही बारसू बारसू करत असाल आणि स्व:ता चं बारसं करुन घेत असाल तर पालघर मध्ये अदिवाशींच्या घरात पोलीस का घुसवले? अशी टीका उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे.