Uddhav Thackeray : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु (Maratha Reservation) असलेले उपोषण मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी नवव्या दिवशी मागे घेतले आहे. शिष्टमंडळासोबतच्या चर्चेनंतर जरांगे यांनी सरकारला दोन महिन्यांची मुदत दिली आहे. 2 जानेवारीपर्यंत आरणक्षणाचा निर्णय न झाल्यास 3 जानेवारीनंतर मुंबईच्या सगळ्या वेशींवर चक्काजाम आंदोलन करण्याची घोषणा त्यांनी केली आहे. याकाळात साखळी उपोषणही सुरु राहणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले होते. या मुद्द्यावर आता ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) सामनाच्या अग्रलेखातून भाष्य केले आहे. तसेच मोदी सरकारवरही जोरदार टीका केली आहे.
Disqualification Mla : विधीमंडळात सुनावणी सुरु; शिंदे गटाच्या नेत्यांची दांडी, तर वकिलांचा गोंधळ…
मराठा आरक्षणाचा पेच हा महाराष्ट्राच्या गळ्याला लागलेला फास आहे. एरवी राज्याच्या राजकारणात हस्तक्षेप करणारे भाजपाचे दिल्लीश्वर आता पळ काढत आहेत. 2 जानेवारीनंतर मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे ही जरांगे पाटलांची मागणी आता मान्य झाली आहे. कुणबी प्रमाणपत्र म्हणजे आरक्षण नाही. त्यासाठी संसदेत घटनादुरुस्ती करावी लागेल हे महत्वाचे. जरांगे पाटलांचे उपोषण थांबले हे बरे झाले. मराठ्यांना आरक्षण कसे मिळणार हा पेच मात्र कायम आहे, असे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.
मराठा आरक्षणाची चावी केंद्राच्या हातात
मराठा आरक्षणासाठी जरांगेंनी आता दिल्लीला धडक दिली पाहिजे. आरक्षणाच्या प्रश्नाची चावी पंतप्रधान मोदींच्या खिशात आहे व मोदी या प्रश्नाकडे गांभीर्याने पहायला तयार नाहीत. जरांगे पाटलांनी आता उपोषण मागे घेतले. पण त्यानिमित्ताने महाराष्ट्राच्या मनात काही प्रश्न निर्माण झाले. राज्यातील बेकायदा सरकारने ज्या पद्धतीने हा प्रश्न चिघळवत नेला त्यातून हे प्रश्न उपस्थित झाले आहेत, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.
मराठा आरक्षणाचा पेच हा महाराष्ट्राच्या गळ्याला लागलेला फास आहे. एरवी महाराष्ट्राच्या राजकारणात हस्तक्षेप करणारे भाजपाचे दिल्लीश्वर आता पळ काढत आहेत. कायदेशीर बाबी पूर्ण करूनच न्यायालयात टिकणारे आरक्षण देण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचा ठराव सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत केला. पण अशा ठरावाच्या डरावने काहीच घडणार नाही, अशी टीका ठाकरे गटाने राज्य सरकारवर केली.
Lok Sabha Election : 2024 साठी खडसेंची मोठी घोषणा! तिकीट मिळाल्यास रावेरमधून लढणार
दगाफटका केला तर सरकारच्या नाड्या आवळू – जरांगे पाटील
सरकारने दगाफटका केला तर त्यांच्या नाड्या आवळू. त्यांच्या र्थिक, सामाजिक आणि व्यावसायिक नाड्या आवळू.. थेट मुंबईत जाऊन बसायचं… त्यांना भाजीही द्यायची नाही. त्यामुळं दगाफटका बसला तर आत्तापासूनच तयार राहा, असंही जरांगे म्हणाले. उपोषण मागे घेतलं तरी साखळी उपोषण सुरूच राहणार. आपल्याला आंदोलनाची दिशा बदलायची आहे. तालुका, जिल्हा, गावपातळीवर जाऊन व्यापक आंदोलन करायचं. मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत मी माझ्या घराचा उंबरठाही ओलांडणार नाही. मी मराठ्यांचा अपमान होऊ देणार नाही. लेकरायची शपथ घेऊन सांगतो, सरकारच्या बाजूनं जाणार नाही, असंही जरांगेंनी स्पष्ट केलं.