Maratha Reservation : सरकारला नेमकी किती दिवसांची मुदत? जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं

Maratha Reservation : सरकारला नेमकी किती दिवसांची मुदत? जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु (Maratha Reservation) असलेले उपोषण मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी नवव्या दिवशी मागे घेतले आहे. शिष्टमंडळासोबतच्या चर्चेनंतर जरांगे यांनी सरकारला दोन महिन्यांची मुदत दिली आहे. 2 जानेवारीपर्यंत आरणक्षणाचा निर्णय न झाल्यास 3 जानेवारीनंतर मुंबईच्या सगळ्या वेशींवर चक्काजाम आंदोलन करण्याची घोषणा त्यांनी केली आहे. याकाळात साखळी उपोषणही सुरु राहणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले होते. सरकारला 24 डिसेंबरपर्यंतचा वेळ दिला आहे. पण, मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितल्यानुसार 2 जानेवारीपर्यंत वेळ दिला आहे. यावरून संभ्रम निर्माण झाला आहे. त्यानंतर आज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, सर्वांच्या समक्ष ठरलं आह. तेच म्हणाले की 24 डिसेंबरपर्यंत समितीला वेळ दिलेला आहे. गायकवाड साहेबांचा शब्द आम्ही मानला. बच्चू कडूही याचे साक्षीदार आहेत. ते म्हणाले, की 24 डिसेंबरपर्यंत तरी वेळ द्या. मात्र बोलण्यात ऐकण्यात फरक झाला असेल. फार जास्त काही नाही सात आठ दिवसांचा फरक आहे. पण, खरं बोलायचं म्हणजे 24 डिसेंबर तारीख ठरली आहे. तेवढा वेळ पण देणार नव्हतो. पण, त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला आत घेतलं आहे. सर्वांचं कल्याण होणार म्हणून 24 डिसेंबर तारीख दिली आहे.

‘साखळी उपोषण सुरूच राहणार; विश्वासघात केला तर नाड्या आवळू’; मनोज जरांगेंनी ठणकावून सांगितलं

 मी समाजाशी कधीच खोटं बोलत नाही 

मनोज जरांगे पाटील यांच्यावर सध्या छत्रपती संभाजीनगर येथील गॅलॅक्सी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. येथे प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला. सरसकट आरक्षण देण्याचीच चर्चा झालेली आहे. समाजाशी मी कधीच खोटं बोलत नाही. फक्त मराठवाड्यासाठी नाही तर सरसकट महाराष्ट्रासाठी काम करण्याची मागणी मी केली. ते त्यांनी मान्य केलं. म्हणून दोन महिन्यांची मुदत त्यांना दिली.

दगाफटका केला तर सरकारच्या नाड्या आवळू 

सरकारने दगाफटका केला तर त्यांच्या नाड्या आवळू. त्यांच्या र्थिक, सामाजिक आणि व्यावसायिक नाड्या आवळू.. थेट मुंबईत जाऊन बसायचं… त्यांना भाजीही द्यायची नाही. त्यामुळं दगाफटका बसला तर आत्तापासूनच तयार राहा, असंही जरांगे म्हणाले. उपोषण मागे घेतलं तरी साखळी उपोषण सुरूच राहणार. आपल्याला आंदोलनाची दिशा बदलायची आहे. तालुका, जिल्हा, गावपातळीवर जाऊन व्यापक आंदोलन करायचं. मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत मी माझ्या घराचा उंबरठाही ओलांडणार नाही. मी मराठ्यांचा अपमान होऊ देणार नाही. लेकरायची शपथ घेऊन सांगतो, सरकारच्या बाजूनं जाणार नाही, असंही जरांगेंनी स्पष्ट केलं.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज