Uddhav Thackeray Group Meeting On Matoshree : विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे ठाकरे गटात (Uddhav Thackeray) आधीच मरगळ आलीय. जळगावमध्ये (Jalgaon) ठाकरे गटात नवीन संघटनात्मक बदलांमुळे अंतर्गत गटबाजी फोफावल्याचं समोर आलंय. यासाठी जुन्या पदाधिकाऱ्यांनी संपर्क प्रमुखांच्या तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे 2 एप्रिल रोजी मातोश्रीवर (Matoshre) बैठक झाली. या बैठकीत आगामी निवडणुकांसंदर्भातील चर्चा होण्याऐवजी जळगावमधील संघटनात्मक वादालाच फोडणी दिल्याचं समोर आलंय.
गटबाजीच्या विषयावरून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संजय सावंत यांच्यासह अन्य काही पदाधिकाऱ्यांची देखील कानउघडणी केलीय. पक्ष संघटना मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करा, अशा सूचना (Uddhav Thackeray Group Meeting) केल्यात. तर कुलभूषण पाटील यांची जळगावात ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आलीय.
ट्रम्प यांच्या ‘टॅरिफ’ बॉम्बने शेअर बाजार धडाम; सेन्सेक्स पाठोपाठ निफ्टी कोसळला..
विधानसभा निवडणुकीत जळगाव शहरासाठी उमेदवारी न मिळाल्याने कुलभूषण पाटील यांनी पक्षाच्या उमेदवार जयश्री महाजन यांच्या विरोधात बंडखोरी केली होती. त्याची शिक्षा म्हणून ठाकरे गटाने नंतर पाटील यांची पक्षातून हकालपट्टी (Maharashtra Politics) केली होती. मात्र, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ठाकरे गटाने कुलभूषण पाटील यांनाच थेट जिल्हाप्रमुखाची जबाबदारी सोपवली. यामुळे सर्वांनाच मोठा आश्चर्याचा धक्का बसला.
त्यामुळे ठाकरे गटातील गटबाजी उफाळली आहे. अनेक जुन्या पदाधिकाऱ्यांनी संजय सावंत यांच्यावर पक्षपातीपणाचे आरोप केलेत. मातोश्रीवर पार बैठकील्या संपर्कप्रमुख संजय सावंत, जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील, जिल्हा संघटक करण पवार, पीयूष गांधी, नीलेश चौधरी यांच्यासह इतर काही पदाधिकारी देखील उपस्थित होते.
मोठी बातमी! मणिपुरात राष्ट्रपती राजवटच राहणार; लोकसभेत प्रस्तावही झाला मंजूर
मातोश्रीवर काल झालेल्या या बैठकीत आगामी निवडणुकांवर चर्चा होणार होती. परंतु त्याऐवजी अंतर्गत गटबाजीवरून वाद झाल्याचं समोर आलंय. उद्धव ठाकरे यांच्यासमोर संघटनात्मक वादाची तक्रार करण्यात आली. संजय सावंत यांच्या कार्यपद्धतीबाबत अनेक पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंकडे व्हॉट्सअॅपवरून तक्रारी करण्यात आल्या होत्या. यावरच चर्चा पार पडली.