Download App

Vidhansabha Election : विद्यमान आमदारांची ‘मातोश्री’वर बैठक, उद्धव ठाकरेंनी 15 आमदारांना एबी फॉर्मही दिले?

ठाकरे गटाची आज महत्त्वपूर्ण बैठक मातोश्रीवर झाली. रुग्णालयातून बाहेर येताच पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत बैठक ही बैठक झाली.

  • Written By: Last Updated:

Uddhav Thackeray : विधानसभा निवडणुकीचा (Vidhansabha Election) बिगुल वाजल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला. ठाकरे गटाने (UBT) बैठकांचा सपाटा लावला आहे. ठाकरे गटाची आज महत्त्वपूर्ण बैठक मातोश्रीवर झाली. रुग्णालयातून बाहेर येताच पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत बैठक ही बैठक झाली. यावेळी उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) उपस्थित आमदारांना मार्गदर्शन करत त्यांना उमेदवारीची खात्री दिली.

महिला बाल व विकास मंत्री आदिती तटकरेंचं फेसबुक अकाऊंट हॅक 

विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने ठाकरे गटाच्या आमदारांची आज मातोश्रीवर बैठक संपन्न झाली. यावेळी उपस्थित आमदारांना यादीह जाहीर होण्याची वाट पाहू नका, तुमच्याबाबतीत ती केवळ औपचारिकता आहे, असं म्हणत आजच्या बैठकीमध्ये विद्यमान आमदारांना उद्धव ठाकरेंकडून एबी फॉर्म देण्यात आल्याची माहिती आहे.

या बैठकीला शिवसेनेचे ठाकरे गटाचे एकूण 15 विद्यमान आमदार उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीसाठी बहुतांश आमदारांची तिकिटे निश्चित मानली जात आहेत. ज्या आमदारांना मुहूर्तावर एखादा दिवस ठरवून एबी फॉर्म घेऊन जायचे, ते आमदार त्या दिवशी एबी फॉर्म घेऊन जातील, असं समजतं. 22 ऑक्टोबरपासून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या सूचनाही या बैठकीत दिल्या आहेत.

इम्तियाज जलील यांची मोठी घोषणा, विधानसभेसह नांदेड लोकसभा पोटनिवडणूकही लढवणार 

दरम्यान, निवडणूक आयोगाने राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा केली असून २० नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान होत आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षप्रमुखांकडून विद्यमान आमदारांना एबी फॉर्म देण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते.

मविआ निवडणूक आयोगाकडे जाणार….
दरम्यान, महाविकास आघाडीकडून जागावाटपाबाबत बैठक झाली. बैठकीनंतरही अद्याप 20 ते 22 जागांचा तिढा कायम असल्याचं समोर आलं. अशातत महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ उद्या राज्य निवडणूक आयोगाला भेटणार आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला ज्या काही त्रुटी जाणवल्या त्या दृष्टीकोनातून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने तक्रारींचे निवारण करावे, अशा सूचना देण्यासाठी जाणार असल्याची माहिती पटोले यांनी दिली आहे.

 

 

follow us