‘या गद्दारांना न्यायालय धडा शिकवेल…; अंबादास दानवेंचा शिंदे गटावर जोरदार हल्लबोल 

मुंबई : महाराष्ट्रात सत्तासंघर्षांवर सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुरू असलेल्या सुनावणीचा आज तिसरा दिवस आहे. अवघ्या राज्याचे लक्ष या सुनावणीकडे लागले आहे. या दोन्ही बाजूच्या वकिलांकडून सध्या जोरदार युक्तिवाद सुरूय. दरम्यान राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया सध्या समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी शिंदे गटावर (Shinde Group) जोरदार हल्लाबोल […]

Untitled Design (58)

Ambadas Danve

मुंबई : महाराष्ट्रात सत्तासंघर्षांवर सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुरू असलेल्या सुनावणीचा आज तिसरा दिवस आहे. अवघ्या राज्याचे लक्ष या सुनावणीकडे लागले आहे. या दोन्ही बाजूच्या वकिलांकडून सध्या जोरदार युक्तिवाद सुरूय. दरम्यान राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया सध्या समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी शिंदे गटावर (Shinde Group) जोरदार हल्लाबोल केला.

या निकालाची दिशा तर न्यालयाच्या दिशेने असणार आहे, कारण ज्या पद्धतीने शिवसेना (Shiv Sena) पक्षाशी ४० लोकांनी गद्दारी केली आहे. या गद्दारांना चांगला धडा तर न्यायालय शिकवणारच आहे, ही खात्री आहे. कायद्याच्या चौकटीमध्ये जर बघितलं, तर पक्षांतर बंदी कायदा असणार आहे, निश्चित या ४० लोकांनी मोठी चूक केली आहे, याची शिक्षा त्यांना भोगावी लागणार आहे. असं अंबादास दानवे यांनी दावा केला.

Girish Bapat : भाजपचा ‘घायाळ वाघ’ अखेर मैदानात

शिवाय पक्षाच्या ज्या बैठकांना ही सगळी गद्दार मंडळी हजर होती. या सर्वांनी पक्षनेतृत्वाला बाजूला केलं आहे, वेगळ्या पद्धतीने राज्यपालांकडे दावा केला. हे पक्षश्रेष्ठीला धरून नाहीत, म्हणून या सगळ्या गोष्टीच्या खेळीवर निश्चितपणे येणाऱ्या काळात न्याय होणार. असे देखील दानवेंनी यावेळी प्रतिक्रिया दिली. याबरोबर उद्धव ठाकरे हे काय खुर्चीला चिकटून बसणारं नेतृत्व नाही. खुर्चीसाठी काम करणारं नेतृत्व नाही, खुर्ची त्यांच्यासाठी आली होती. म्हणून त्यांनी जो त्यावेळेस त्यांच्या बुद्धीला स्मरून, आंतरिक आत्म्याने जो आवाज दिला, त्यानुसार प्रतिक्रिया दिली आहे. कायदा जे करेल ते करेल, असा जोरदार हल्लाबोल शिंदे गटावर केला.

Exit mobile version