गद्दार गेले, आणि हिरे सापडले; उद्धव ठाकरेंचा शिंदे गटाला टोला

मुंबई: भाजपचे मालेगाव तालुक्यातील अद्वय हिरे (advay hire) यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेना पक्षात प्रवेश केला. यावेळी शिवसेना भवन येथे बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray ) यांनी मिंधे गटावर जोरदार टीका केली, ‘बरं झालं गद्दार गेले त्याच्यामुळे हिरे सापडले’, सणसणीत टीका यावेळी केली. पुढे ते म्हणाले की, ‘एखाद्या पक्षावर विरोधीपक्षानं घाला घातला तर हा […]

Untitled Design (16)

uddhav thackeray

मुंबई: भाजपचे मालेगाव तालुक्यातील अद्वय हिरे (advay hire) यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेना पक्षात प्रवेश केला. यावेळी शिवसेना भवन येथे बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray ) यांनी मिंधे गटावर जोरदार टीका केली, ‘बरं झालं गद्दार गेले त्याच्यामुळे हिरे सापडले’, सणसणीत टीका यावेळी केली.

पुढे ते म्हणाले की, ‘एखाद्या पक्षावर विरोधीपक्षानं घाला घातला तर हा भाग वेगळा. पण एकेकाळचा मित्र पक्ष म्हणून त्याचं कामकाज कसं चालतं हे अद्वय यांनी सांगितलं आहे. आम्ही २५-३० वर्ष भोगले आहे. त्यांना देखील आम्ही पालखीत बसवून मिरवणुका काढल्या, पण पालखीत बसवून उदो उदो झाल्यावर त्यांना वाटायला लागलं की हे कायमचे आपले आहेत. मी हे कायम सांगितलं शिवसेनाप्रमुखांनी जी शिवसेना (Shiv Sena) स्थापन केली आहे, ती भाजपची पालखी वाहून नेण्यासाठी नाही. हिंदुत्त्वाची पालखी वाहण्यासाठी केली आहे, असं उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना पुन्हा एकदा ठणकावलं.

आज त्यांचा जो किळसवाणा प्रकार सध्या सुरू आहे. यामुळे तरुणांमध्ये सध्या संभ्रम आहे की, राजकारण हे इतकं घाणेरडं आहे का ? मी सांगतो की कोणतंही क्षेत्र घाणेरडं नसतं. चांगली किंवा वाईट माणसं त्याला चांगलं किंवा वाईट ठरवतात. त्याचप्रमाणे आता संपूर्ण देशात जो अत्यंत घाणेरडा किळसवाणा राजकारण भाजपने पाडलेला आहे, तो आपल्याला गाडून टाकायचा आहे, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

आम्ही लोक निवडणुकांची वाट पाहत आहेत. महिन्याभरात मालेगावात सभा घेऊ. आज जो सर्वे प्रसिद्ध झाला त्यात आज निवडणुका झाल्या तर महाविकास आघाडील ३४ जागा मिळणार असल्याचा अंदाज लावण्यात आला. मात्र सर्व एकत्र लढलो तर लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला ४० जागा मिळतील, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

Exit mobile version