Uddhav Thackeray On Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महायुतीला (Mahayuti) बिनशर्त पाठींबा दिला. नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या खंबीर नेतृत्वासाठी भारतीय जनता पक्ष, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) यांना बिनशर्त पाठिंबा देत असल्याचे त्यांनी जाहीर केलं. त्यावर आता ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) प्रतिकिया दिली.
तुम्हाला लोक भाड्याने का घ्यावे लागतात? इंजिनाची चाकं…; अमित शाहांच्या टीकेला ठाकरेंचं प्रत्युत्तर
जळगावातील शेकडो बीआरएस कार्यकर्त्यांनी आज (दि. 13) मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवबंधन बांधले. याशिवाय लक्ष्मण पाटील यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, देशातही एकाधिकारशाही ही देशासाठी घातक आहे. काही जण त्यांना उघड उघड बिनशर्त पाठिंबा देत आहेत. तर काहीजण लढण्याचे नाटक करून महायुतीला पाठिंबा देत आहेत, असं म्हणत त्यांनी राज ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांना टोला लगावला. हे नाटक जनता ओळखत आहे. आता थेट हुकूमशाही विरुद्ध लोकशाही अशी लढत होणार आहे, असं ठाकरे म्हणाले.
बस रोखली, प्रवाशांना ताब्यात घेतले अन् हत्या केली; दहशतवादी हल्ल्याने पाकिस्तान हादरला
यावेळी त्यांनी पुन्हा एकदा केंद्र आणि राज्यातील महायुती सरकारवर हल्ला चढवला. सद्य स्थितीतीत महाराष्ट्रसह देशभरात केंद्र सरकारविरोधात रोष दिसून येत आहे. हा असंतोष 10 वर्षांनंतर प्रथमच दिसत आहे, असं ते म्हणाले.
एकाधिकारशाही नको, संमिश्र सरकार हवं
एकाधिकारशाही ही देशाला घातक आहे. एका व्यक्तीच्या हातात संपूर्ण देश दिला तर तो देशाचा गळा घोटल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला वाटतं संमिश्र सरकार नको, पण इतिहास बघितला तर अटलबिहारी वाजपेयी यांनीही संमिश्र सरकार चांगले चालवले. नरसिंह राव, मनमोहन सिंग यांनीही चांगली संमिश्र सरकारं चालवली. संमिश्र सरकारच्या काळात देशाची प्रगती झाली आहे. ठाकरे म्हणाले की, देश मजबूत करायचा असेल तर संमिश्र सरकार हवे, असं ठाकरे म्हणाले.
आज वंचित बहुजन आघाडी, बीआरएस पक्षातील पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला असून हे पदाधिकारी केंद्र सरकारला कंटाळले असून महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीच्या मागे उभे राहण्यास तयार आहेत. यामुळे जळगावात शिवसेनेची ताकद निश्चितच वाढली आहे. जळगावात ठाकरे गट नक्कीच जिंकेल. जळगावातून आम्हाला खूप पाठिंबा मिळत आहे, असंही ठाकरे म्हणाले.