Download App

Maharashtra Politics : फक्त सहानुभूती मिळवण्यासाठी ठाकरेंची धडपड; केसरकरांचा आरोप

  • Written By: Last Updated:

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह शिवसेना आमदारांनी केलेल्या बंडानंतर सेनेत दोन गट पडले. या दोन्ही गटातील नेते सातत्याने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसतात. शिवसेनेच्या दोन्ही गटांनी पुन्हा एकदा एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले आहेत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पत्रकार परिषदेला प्रत्युत्तर देण्यासाठी एकनाथ शिंदे गटाचे नेते आणि मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी आज पत्रकार परिषद घेत ठाकरेंवर टिकास्त्र डागले. फक्त सहानुभूती मिळवण्यासाठी ठाकरेंचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केसरकरांनी केला.

शिवसेना कुणाची यावरून सुरू असलेल्या वादावर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन नवी मागणी केली आहे. सुप्रीम कोर्टात जोपर्यंत 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय होत नाही, तोपर्यंत निवडणूक आयोगातली सुनावणी होऊ नये, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. उद्धव ठाकरे यांनी यासाठी पत्रकार परिषद घेतली. शिवसेना कुणाची हा वाद सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगात असताना उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद का घेतली? असा प्रश्न उपस्थित होत आहे, यावरून ठाकरेंच्या पत्रकार परिषदेवर केसरकरांनी घणाघाती आरोप केला.

‘सध्या या संदर्भात निवडणूक आयोगाकडे आणि सुप्रीम कोर्टात केसेस सुरू आहेत. त्यांचं जे काही म्हणणं आहे ते त्यांनी सुप्रीम कोर्टात किंवा निवडणूक आयोगात सांगावं. फक्त सहानुभूती मिळवण्यासाठी हे सुरू आहे, असा आरोप दीपक केसकरांनी केला. मात्र, त्यांना काय वाटतं हे महत्त्वाचं नाही. त्यामुळं उद्धव ठाकरेंना जे काही सांगायचं ते त्यांनी कोर्टात सांगावं, असं केसरकर म्हटले.

एकनाथ शिंदे यांचे मुख्यनेता पद घटनाबाह्य आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय लागेपर्यंत निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्हाचा निर्णय देऊ नये. या उध्दव ठाकरेंच्या मागणीवर केसरकर म्हणाले, त्यांना काय वाटतं हे महत्वाचं नाही. सुप्रीम कोर्टाने असे कुठलेही आदेश निवडणूक आयोगाला दिलेले नाही आहेत. निवडणूक आयोग देखील सप्रीम कोर्टाचेच ऐकले. उद्धव ठाकरेंनी हे जनतेला सांगणयापेक्षा निवडणूक आयोगाला सांगावं. निवडणूक आयोग हे घटनात्मक पद आहे. तिथं वकील नेमूण ठाकरेंनी आपली बाजू मांडावी. मुळात लोकांची सहानुभूमी मिळवण्यापेक्षा ठाकरेंवर आज ही वेळ का आली, हे त्यांनी एकदा जनतेला सांगावं, असा खोचक टोलाही केसरकरांनी ठाकरेंना यावेळी लगावला.

याशिवाय, ‘बाळासाहेब ठाकरेंनी १९९८ साली निवडणूक आयोगाला हमी दिली होती, की पक्षात लोकशाही पद्धत राबवण्यात येईल. पण, २०१३ आणि २०१८ साली झालेल्या पक्षाच्या निवडणुकीत लोकशाही पद्धत राबवण्यात आली नाही.’ हा खुलासाही यावेळी पत्रकार परिषदेत केसरकरांनी केला.

 

 Bollywood movie : ‘अंडरवर्ल्ड का कब्जा’ च्या निमित्त श्रिया सरनने व्यक्त केल्या भावना…

दरम्यान, उध्दव  ठाकरे हे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार होते; असा खळबळजनक आरोप केसरकरांनी केला. पत्रकार परिषदेत बोलतांना केसरकर म्हणाले, आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडायला हवं, अशी आमची मागणी गेल्या अनेक महिन्यांपासूनची होती. अनेकदा ही बाब उद्धव ठाकरेंच्या कानावर घातली. त्यांनाही ते पटलं होते. त्यामुळं दिल्लीत मोदींसोबत झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीसोबत आम्ही गेलो, हे चुकीचं झालं, असं मोदीसमोर मान्य केलं होतं. आणि ते दिल्लीतून परत आल्यावर ‘मविआ’तून बाहेर पडणार होते. तसा त्यांनी मोदींना शब्द दिला होता. मात्र, नंतर उद्धव ठाकरेंनी तसं केलं नाही. खरंतर भाजप – शिवसेना एकत्र आली पाहीजे, असं वाटतं. कारण, हा राष्ट्रहिताचा विचार असल्याचंही केसरकरांनी सांगितले.

 

Tags

follow us

वेब स्टोरीज