Download App

बंडखोरी टाळण्यासाठी उद्धव ठाकरेंकडून खरबरदारी, नव्या आमदारांकडून शपथपत्र लिहून घेणार

भरत गोगवाले यांनी ठाकरे गटाचे काही आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे शपथपत्र लिहून घेणार आहेत.

  • Written By: Last Updated:

Uddhav Thackeray : राज्यातीविधानसभेच्या निकालाने (Vidhansabha Election) महाविकास आघाडीचं (Mahavikas Aghadi) पाणीपतं झाल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, राज्यात महायुतीला (Mahayuti) तब्बल 236 जागांवर स्पष्ट बहुमत मिळालं या निवडणुकीत ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. कारण 95 जागां लढवूनही ठाकरे गट केवळ वीस जागा जिंकण्यात यशस्वी ठरला. त्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) ‘मातोश्री’वर पक्षाच्या नवनिर्वाचित 20 आमदारांची बोलावली. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत.

मोठी बातमी : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा सभागृह नेता ठरला; कोणाच्या खांद्यावर जबाबदारी? 

उद्धव ठाकरे यांचे 20 आमदार निवडून आले आहेत. महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सर्वाधिक जागा मिळाल्याचं दिसून येत आहे. मात्र, सत्ता स्थापनेपूर्वीच उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक बोलावली असून आमदारांकडून शपथपत्र लिहून घेतले जाणार असल्याची माहिती आहे. ठाकरेंना पक्षफुटीचा अनुभव आहे. दरम्यान, अनेक नेत्यांनी ठाकरेंची साथ सोडली. शिवाय शिंदे गटाचे आमदार भरत गोगवाले यांनी ठाकरे गटाचे काही आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे शपथपत्र लिहून घेणार आहेत.

पक्षप्रमुखांचा निर्णय अंतिम राहणार असून सर्व आमदार या निर्णयाला बांधील असतील, असं यात नमूद केलं जाणार आहे.

दरम्यान, यावेळी मातोश्रीवर उपस्थित आमदारांना उद्धव ठाकरेंनी मार्गदर्शन केलं. विधानसभा निवडणुकीतील पराभवाच्या कारणांवरही चर्चा झाली असल्याचं समजतं.

भास्कर जाधवांची गटनेतेपदी निवड
या बैठकीत ठाकरे गटाकडून गटनेत्याची नियुक्ती करण्यात आलीयं. यामध्ये आदित्य ठाकरे यांची सभागृह नेतेपदी तर सुनील प्रभू यांची प्रतोदपदी निवड करण्यात आलीयं. यासोबतच भास्कर जाधव यांची गटनेतेपदी निवड करण्यात आलीयं. या

follow us