मोठी बातमी : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा सभागृह नेता ठरला; कोणाच्या खांद्यावर जबाबदारी?

मोठी बातमी : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा सभागृह नेता ठरला; कोणाच्या खांद्यावर जबाबदारी?

Udhav Thackeray Group : राज्यात विधानसभा निवडणुकीचे (Assembly Election) निकाल समोर आल्यानंतर सर्वच पक्षांकडून गटनेतेपदासाठी बैठका सुरु आहेत. कालच एकनाथ शिंदेंच्या सेनेचा गटनेता ठरल्यानंतर आज उद्धव ठाकरे गटाकडून (Udhav Thackeray Group) गटनेत्याची नियुक्ती करण्यात आलीयं. यामध्ये आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांची सभागृह नेतेपदी तर सुनील प्रभू यांची प्रतोदपदी निवड करण्यात आलीयं. यासोबतच भास्कर जाधव यांची गटनेतेपदी निवड करण्यात आलीयं. या बैठकील ठाकरे गटाचे सर्वच 20 आमदार होते. या सर्व आमदारांच्या सर्वानूमते निवड करण्यात आलीयं.

अजित पवारांच्या कटाचा मी बळी ठरलो; भाजपने गांभिर्यानं घ्यावं, राम शिंदेंनी सांगितलं पराभवाचं कारण

विधानसभेसाठी 20 नोव्हेंबरला मतदानाचा प्रक्रिया पार पडल्यानंतर 23 नोव्हेंबरला निकाल समोर आला. या निकालामध्ये महायुतीलाच भरघोस जागा मिळाल्या असून
ठाकरे गटाला अवघ्या 20 जागांवर समाधान मानावं लागलंय. याबाबत उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत नाराजी व्यक्त केली असून विधानसभा निवडणुकीचा निकाल राज्यातील जनतेला मान्य आहे का? असा थेट सवाल उद्धव ठाकरेंनी केलायं. तसेच ईव्हिएम मशीनच्या घोटाळ्यावरुनही उद्धव ठाकरे यांनी संशय व्यक्त केलायं. अखेर निवडणूक आयोगाचा निकाल अंतिम मानून पुढील कामकाज करावे लागणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलंय.

पृथ्वीराज चव्हाणांना धक्का देणारे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसल्याचं दिसून आलं. महायुतीला 236 जागा मिळाल्या असून एकट्या भाजपने 132 जागांवर विजय मिळवलायं. त्यामुळे भाजपच सर्वांत मोठा पक्ष ठरलायं. तर एकनाथ शिंदेंच्या सेनेलाही घवघवीत यश मिळालं असून 57 जागांवर विजय मिळवण्यात शिंदेसेनेला यश मिळालंय. तर दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 41 जागांवर दणदणीत विजय मिळवलायं. तर दुसरीकडे महाविकास आघाडीमधील घटक पक्ष शरद पवार गटाला 10 तर ठाकरे गटाला 20 आणि काँग्रेसला अवघ्या 16 जागांवरच समाधान मानावं लागलंय.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube