आमची सत्ता आल्यावर दिशा सालियान प्रकरणाची पुन्हा चौकशी लावणार; रामदास कदमांचा आदित्य ठाकरेंना इशारा

आमची सत्ता आल्यावर दिशा सालियान प्रकरणाची पुन्हा चौकशी लावणार; रामदास कदमांचा आदित्य ठाकरेंना इशारा

Ramdas Kadam Warning To Aaditya Thackeray : रत्नागिरीमध्ये आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या सभा झाल्या. यावेळी त्यांनी योगेश कदम यांच्यावर टीका केलीय. यावरून शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी केलीय. गद्दारी आदित्य ठाकरेंनी केलीय. पाठीत खंबीर खुपसण्याचं काम केलंय. यावेळी रामदास कदम म्हणाले की, आदित्य तूच मला काका-काका म्हणत होता ना? तुझा बाप मुख्यमंत्री झाला तेव्हा काकाला बाहेर ठेवलस आणि काकाचा पर्यावरण खातं तू घेतलस त्यावेळी काकाच्या पाठीत खंजीर खुपसताना तुला थोडी तरी लाज वाटली नाही का? बर्फाच्या लादीवर झोपवण्याची भाषा करतोस तुझी औकात आहे का? असा आक्रमक सवाल रामदास कदम यांनी विचारला आहे.

Ramdas Kadam : केसाने गळा कापू नका, अन्यथा… रामदास कदमांच्या वक्तव्याने महायुतीत ठिणगी

शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर पुन्हा टीका केलीय. आदित्य ठाकरेला जनाची नाही तर, मनाची थोडीशी लाज असती तर योगेश कदमला गद्दार म्हणायची त्याची हिंमत झाली नसती, अशी टीका रामदास कदम (Maharashtra Politics) यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केलीय. योगेश कदम शिवसेनेत असताना दापोलीच्या नगरपंचायत निवडणुकीमध्ये त्याला एकही एबी फॉर्म दिला नाही. तर स्थानिक आमदार असताना त्याला उचलून बाजूला ठेवलं असल्याचं रामदास कदम म्हणाले आहेत.

Ramdas Kadam : ‘राज ठाकरेंमुळे उद्धव ठाकरेंनी माझ्यावर’.. कदमांचा मोठा गौप्यस्फोट

बापाला विचार नारायण राणे आणि राज ठाकरे ज्यावेळी बाहेर पडले, तेव्हा गाडीच्या पुढच्या सीटवर मला बसवल्याशिवाय तुझा बाप बाहेर पडत नव्हता. दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरे यांचे नाव होते. आमची सत्ता आल्यावर त्या प्रकरणाची पुन्हा चौकशी लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आदित्य ठाकरे रात्री 12 वाजता घरच्या बाहेर जाऊन सकाळी पाच वाजता येतो, याचे रात्रीचे धंदे महाराष्ट्राच्या समोर यायला पाहिजेत. आपली औकात बघून आदित्यने बोलावे, अशी आक्रमक भूमिका रामदास कदम यांनी घेतली आहे.

यावेळी रामदास कदम म्हणाले की, पक्ष आम्ही वाढवला आहे. जेल आम्ही भोगली आहे. यात तुमचं योगदान काय आहे? कोणाला बोलताय, काय बोलताय याचं भान ठेवा, असा इशारा रामदास कदम यांनी आदित्य ठाकरेंना लगावला आहे. आमची सत्ता आल्यावर दिशा सालियान प्रकरणाची पुन्हा चौकशी लावणार, असा इशारा रामदास कदम यांनी दिलाय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube