BJP On Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray)यांच्याबद्दल भाजप (BJP)नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)यांनी वादग्रस्त दावा केला. त्यावरुन वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. बाबरी (Babri)पाडल्याच्या वादातून चंद्रकांत पाटलांना उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) सुनावलं होतं. त्याचवेळी उद्धव ठाकरे हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule)यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, बावनकुळे वगैरे माझ्या खिजगिनतीत पण नाहीत अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरेंनी केली. हा वाद थंड होत नाही तोच आता भाजपनं ट्वीट करत उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे. त्यामुळं आता भाजपच्या टीकेवर उद्धव ठाकरे नेमकं काय उत्तर देणार, हे पाहावं लागणार आहे.
Nana Patekar : मी नसिरुद्दीन शाहसाठी नवस केला… अन, माझा देवावरचा विश्वास उडाला!
भाजपनं आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय की, उद्धव ठाकरे एवढा अहंकार बरा नव्हे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबद्दल बोलताना तुम्ही नेहमीच मर्यादा ओलांडली आहे. उद्धव ठाकरे, आम्हाला मोजणारे तुम्ही कोण? तुमचं कर्तृत्व काय? जो व्यक्ती वडिलांचा वारसा सांभाळू शकत नाही, त्या व्यक्तीचे कर्तृत्व काय? अशी घणाघाती टीका केली आहे. उद्धव ठाकरे, सर्वजण तुमच्यासारखे नसतात वडिलांच्या पुण्याईवर जगणारे. काहीजण असतात संघर्ष करून स्वतःच अस्तित्व निर्माण करणारे. उद्धव ठाकरे तरुण वयात तुम्ही ‘छंद’ म्हणून फोटोग्राफी करत होता, त्या वयात चंद्रशेखर बावनकुळे प्रकल्पग्रस्त बेरोजगारांसाठीच्या न्यायासाठी लढत होते.
उद्धव ठाकरे एवढा अहंकार बरा नव्हे!
भाजप प्रदेशाध्यक्ष @cbawankule जी यांच्याबद्दल बोलताना तुम्ही नेहमीच मर्यादा ओलांडली आहे. @OfficeofUT, आम्हाला मोजणारे तुम्ही कोण? तुमचं कर्तृत्व काय? जो व्यक्ती वडिलांचा वारसा सांभाळू शकत नाही, त्या व्यक्तीचे कर्तृत्व काय?
1/5— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) April 11, 2023
उद्धव ठाकरे, तुम्हाला जे काही मिळालं ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्याईने. पण, तुम्हाला त्यांच्या संघर्षाची किंमत सुद्धा कळली नाही. उद्धव ठाकरे जो व्यक्ती स्वतःच्या वडिलांच्या विचारांची प्रतारणा करतो, तो व्यक्ती इतरांचा सन्मान कसा करेल? असा सवालही या ट्वीटद्वारे विचारला आहे.
तुम्हाला माहिती नसेल तर माहिती करून घ्या. चंद्रशेखर बावनकुळे संघटनेसाठी 16 तास कार्यकर्त्यांमध्ये जाऊन काम करतात. तुम्ही जेवढा वेळ घरात झोपा काढता तेवढा वेळ ते काम करतात. घरात बसून पक्ष संपवणाऱ्या व्यक्तीने कर्तव्यनिष्ठ व्यक्तीबद्दल बोलू नये.
वैफल्यग्रस्त व्यक्ती आयुष्यात कधीच कर्तृत्ववान होऊ शकत नाही. कारण, तो स्वतःच्या नशिबाला कर्तृत्व समजून बसतो. आणि उद्धव ठाकरे तुम्ही वैफल्यग्रस्त आहात, अशी थेट टीका केली आहे. तुमचा पराभव तुमचा अहंकारच करेल. अहंकार एवढा बरा नसतो. कर्तृत्ववान बना नंतर इतरांवर टीका करा, अशी घणाघाती टीका भाजपनं उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.