Nana Patekar : मी नसिरुद्दीन शाहसाठी नवस केला… अन, माझा देवावरचा विश्वास उडाला!
Nana Patekar : मी नसिरुद्दीन शाह याचं बरं वाईट व्हावं यासाठी विचार करायचो. त्याचा अपघात होऊ दे, त्याचा पाय मोडू दे.. अस बरच काही करायचो की जेणेकरुन त्याचा रोल मला मिळू दे. इतके ताकदीची भूमिका नसिरुद्दीन शाह करायचा. पण तसं काहीच झालं नाही. त्यामुळे माझा देवावरचा विश्वास उडाला, अशी मिस्कील टिप्पणी करत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी प्रांजळ कबुली दिली आणि सभागृहात एकच हास्यकलोळ झाला.
‘सिंहासन’ चित्रपटाच्या ४४ वर्षपूर्तीनंतर यशवंतराव चव्हाण सेंटरने विशेष संवाद आयोजित केला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, अभिनेते डॉ. मोहन आगाशे, नाना पाटेकर यांच्याशी अंबरीश मिश्र, राजीव खांडेकर यांनी संवाद साधला.
आज मी आणि डॉ. मोहन आगाशे असे दोघेच इथे खांबासारखे बसलो आहे. कारण सिंहासन चित्रपटामधील आता कलाकार गेले. मी आणि मोहन मागे उरलो आहोत. मला चित्रपटासाठी तीन हजार रुपये मानधन दिले. ३० महिन्याचे राशन दिले. पण अजून दोन हजार दिलेले नाही, अशी टिप्पणी नाना पाटेकर यांनी यावेळी केली.
आमच्यावेळी मर्यादा, सुसंस्कृत पणा होता… आतासारखी टोकाची भूमिका नव्हती! – Letsupp
नाना पाटेकर यांचे नसिरुद्दीन शाह यांच्याबाबतची प्रांजळ कबुली दुली. त्यानंतर डॉ. मोहन आगाशे यांनीही तात्काळ टिप्पणा करत मलाही रोल मिळत नसायचे. तेव्हा मीही नाना पाटेकर याचाही अपघात व्हावा आणि त्याचे रोल मला मिळावे, अशी कोटी केल्याने संपूर्ण सभागृहात हास्यकलोळ उडाला.