होय, मी पत्र दिलं होत. पण मी मुख्यमंत्री होतो तेंव्हा पत्र दिलं होतं तर अडीच वर्षात पोलीसांकरवी का जबरदस्ती केली नव्हती? अशी टीका शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्य सरकारवर केली आहे. भारतीय कामगार सेनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. त्यावेळी त्यांनी कामगारांच्या प्रश्नांवर भाष्य करतच सरकारवर देखील टीका केली.
मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीच बारसू (Barsu Refinery) येथील जागा सुचविली होती. त्यांनी रिफायनरीच्या समर्थनार्थ मोदींना पत्र पाठवले होते. 12 जानेवारी 2022 रोजी हे पत्र पाठवण्यात आलं होतं. त्यावेळी राज्य सरकारने बारसू येथे 13 हजार एकर जमीन प्रकल्पासाठी देण्याची तयारी दाखविली होती. तसेच येथील बहुतांश जागा ओसाड असल्याने पुनर्वसनाचा प्रश्न फारसा येणार नाही, असेही या पत्रात म्हटले होते.
Parshuram Ghat : मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी…
या पत्रानंतरच केंद्राने रिफायनरी सुरू करण्यासाठी परवानगी दिली होती. हे पत्र समोर आल्याने आता ठाकरे गटाचीही कोंडी झाली आहे. सत्ताधारी गटातील नेते या पत्रावरून ठाकरे गटावर टीका करू लागले आहेत. त्यावरून आज उद्धव ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिल.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, बारसु वरुन रान पेटवलं जातयं, उद्धव ठाकरेंनी पत्र दिलं होतं…. हो दिलं होतं, मी कुठे नाही म्हणतोय. पण मी मुख्यमंत्री होतो तेंव्हा पत्र दिलं होतं तर अडीच वर्षात पोलीसांकरवी का जबरदस्ती केली नव्हती? बारसु बद्दलची, नाणार बद्दलची माझी भूमिका ही तेथील लोकांची भूमिका! असं उत्तर त्यांनी दिल.
Amol Kolhe : ‘हिंदुत्वा’च्या बाबतीतील राज ठाकरे यांची भूमिका मला पटली
मुख्यंमत्री असताना त्यांची दिल्लीतील लोक सतत फोन करत होते. चांगला प्रकल्प आहे, इतक्या लोकांना रोजगार मिळेल. असं सांगत होते. म्हणून मी प्राथमिक अहवाल घेतला. त्यातून बारसूची जागा समोर आली. पण हा सरकार जर लोकांच्या भल्याचा असेल तर त्यांना समजून का सांगत नाहीत, त्यांच्या डोक्यात का काठ्या घालाव्या लागत आहेत? असा सवाल त्यांनी विचारला.
त्या प्रकल्पाबद्दल लोकांना समोर बसवून त्यांना समजून सांगावं, आम्ही लोकांना समोर बसवून समजून सांगणार होतो. तुम्ही देखील तसंच लोकांना समजून सांगा. पारदर्शक म्हणता ते पारदर्शकपणा दाखवून द्या. असं आव्हान देखील त्यांना दिल.