Udhav Thackeray Vs Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सात सात दिवस झोपत नाहीत, अन् हेलिकॉप्टरने गावाकडं जाऊन आराम करत असल्याचा घणाघात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आज उद्धव ठाकरे अहमदनगर दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या, त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेतून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर थेट निशाणा साधला आहे.
Karnataka Politics : जेडीएस भाजपबरोबर येणार? लोकसभेचे जागावाटप अंतिम टप्प्यात
उद्धव ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सात सात दिवस झोपत नसल्याचं सांगण्यात येतंय, पण त्यानंतर मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने गावाकडं जाऊन आराम करतात, तेच हेलिकॉप्टर घेऊन शेतकऱ्यांच्या बांधावर या उपरोधिक टोला उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.
Anti Heroes: शाहरुख खान ते राजकुमार राव रुपेरी पडद्यावर ठरले ‘पॉवर अँटी हिरोज’
तसेच शिर्डीत काही दिवसांपूर्वी शासन आपल्या दारी कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमावरही निशाणा साधत ठाकरेंनी सत्य परिस्थिती सांगितली आहे. सरकार स्वत:च्या कार्यक्रमांना जोरात खर्च करत असून शासन आपल्या दारी कार्यक्रमात शेतकऱ्यांना जवळपासही फिरकू दिलं नसल्याचं मला शेतकऱ्यांनी सांगितलं असल्याचं ते म्हणालेत.
दिव्यांगांच्या निधीबाबत योग्य भूमिका न घेतल्यास बेमुदत उपोषण; बच्चू कडूंचा सरकारला इशारा
सध्या राज्यात पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळ पडल्याची परिस्थितीत आहे, अशा परिस्थितीत शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडू नका, ढिगळं लावून सरकार बसलंय, अशावेळी सरकार मदत करणार नसेल तर कधी करणार? शेतकऱ्यांवर संकट अशात पालकमंत्री फिरताहेत ना कृषीमंत्री फिरताहेत, सरकारने भटकत राहण्यापेक्षा शेतकऱ्यांना मदत करावी, पक्ष फोडायला पैसे शेतकऱ्यांना द्यायला नाहीत, असाही घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
दुष्काळ सदृश्य अन् पालकमंत्री अदृश्य :
राज्यात पावसाने पाठ फिरवल्याने दुबार पेरणी केलेल्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नूकसान झाले आहेत. अहमदनगरमध्येही हीच परिस्थिती दिसून येत असून अहमदनगर दुष्काळसदृश्य अन् पालकमंत्री अदृश्य असल्याची परिस्थिती असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.