Karnataka Politics : जेडीएस भाजपबरोबर येणार? लोकसभेचे जागावाटप अंतिम टप्प्यात

Karnataka Politics : जेडीएस भाजपबरोबर येणार? लोकसभेचे जागावाटप अंतिम टप्प्यात

Karnataka Politics : दक्षिण भारतातील कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून चारीमुंड्या चीत झाल्यानंतर लोकसभा निवडणुकीसाठी (Karnataka Politics) भाजपने सावध पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. एकट्याच्या बळावर लोकसभेची निवडणूक जड जाईल असे लक्षात मित्रांची शोधाशोध सुरू करण्यात आली. या प्रयत्नांत भाजपला राज्यात मोठा सहकारी मिळाला आहे. भाजप आणि जनता दल (सेक्युलर) यांच्यात लोकसभा निवडणुकीसाठी युती होण्याची चिन्हे दिसत आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांतील जागावाटपाची बोलणी अंतिम टप्प्यात आहेत. जर याबाबत सकारात्मक निर्णय झाला तर दोन्ही पक्ष एकत्रितपणे लोकसभा निवडणूक लढताना दिसतील.

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येदियुरप्पा यांनी मात्र, 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजप जनता दलाशी युती करेल, असे सांगितले. दोन्ही पक्षांची युती होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले असून याबाबत अधिकृत घोषणा 11 सप्टेंबरनंतर केली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

राजस्थानमध्ये वाढली शिंदेंची ताकद; ‘लाल डायरीवरुन’ गेहलोत सरकारला अडचणी आणलेला नेता शिवसेनेत

माजी पंतप्रधान आणि जनता दलाचे नेते एचडी देवेगौडा (H.D. Deve Gowda) यांनी या आठवड्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची नवी दिल्लीत भेट घेतली. जेडीएसने सुरुवातीला आठ जागांची मागणी केली होती. भाजपने मात्र तीनच जागा देऊ केल्या. शेवटी मात्र चार ते पाच जागांवर एकमत झाल्याचे येदियुरप्पा म्हणाले. यानंतर आता जेडीएसही अॅक्शन मोडमध्ये आहे. पक्षाने आपल्या आमदार, माजी आमदार आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून लोकसभा निवडणुकीत भाजपला पाठिंबा देण्याबाबत मते मागवली आहेत. बहुतांश नेते भाजपसोबत युती करण्याच्या बाजूने होते.

जेडीएसला मिळाली फक्त एक जागा

सन 2019 मध्ये जेडीएस आणि काँग्रेस एकत्रित निवडणूक लढले होते. या निवडणुकीत जेडीएसला विशेष काही करता आले नाही. हसन मतदारसंघच जिंकता आला. यानंतर विधानसभा निवडणुकीतही पक्षाची मोठी पिछेहाट झाली. त्याचा फायदा काँग्रेसला मिळाला. यानंतर मागील जुलै महिन्यात एचडी देवेगौडा यांनी पक्ष लोकसभा निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे सांगितले होते. यानंतर मात्र राजकीय गणिते बदलली आहेत. भाजप आणि जेडीएस दोन्ही पक्ष एकत्रित निवडणूक लढण्यावर विचार करत आहेत. जर हे दोन्ही पक्ष एकत्र आले तर काँग्रेससाठी मात्र अडचणीचे ठरणार आहे.

मुख्यमंत्र्यांकडून आमदारांना मोठं गिफ्ट! पगारवाढीची घोषणा, आकडा वाचून व्हाल थक्क

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube