Udhav Thackeray On Eknath Shinde : दिल्लीचेही बूट चाटितो, हे आपल्या भगव्या अवलादीचेच नाहीत, या शब्दांत उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जहरी टीका केलीयं. मुंबईतील दादरमध्ये काल ज्येष्ठ शिवसैनिक कक्ष वर्धापन दिन सोहळा पार पाडला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर नाव न घेता टीका केलीयं. या सोहळ्यासाठी शेकडोंच्या संख्येने ज्येष्ठ शिवसैनिक उपस्थित होते.
ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताचा पराभव, पहलगाम हल्ला ‘बंडखोरीचा हल्ला’; अमेरिकेचा धक्कादायक अहवाल
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, हा काळ विचित्र आहे, हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही. ज्यांच्यासोबत आपण 25 30 वर्षे हिंदुत्व या एका शब्दासाठी म्हणून त्यांचे चोचले ऐकले मान्य केले. ज्यांना कोणी महाराष्ट्रात ओळखंतही नव्हतं, त्यांना आपण महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात नेलं. आता तेच वरती चढल्यानंतर आपल्याला लाथा मारायला लागलेत. त्यांना कल्पना नाही की, एक जमाना हाही होता तो जमाना लवकरच परत येईल. मराठ्यांच्या घोड्यांच्या टाफाने दिल्ली थरथरायची. आपल्या महाराष्ट्र गीतात आहे, दिल्लीचेही तख्त राखतो मराठी तो खरा मराठी, मराठा. आपण मध्ये-मध्ये जे काही फोटो पाहतो दिल्लीचेही बूट चाटितो हे आपल्या भगव्या अवलादीचेच नाहीत, हे सगळे गद्दार आहेत, या शब्दांत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंचा समाचार घेतला.
आधारचं विदआऊट इंटरनेट अन् पेपरलेस व्हेरिफिकेशन करता येणार; सरकारचा भन्नाट प्लॅन वाचलात का?
राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. यामध्ये राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये मोठी उलथापालथ झाल्याचं दिसून आलं. अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर भाजप कार्यकर्त्यांनीही शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेतलं. या घडामोडींवरुन कोणीही कोणाला पक्षात घेऊ नका, असा महायुतीचा धर्म आहे, तो आपल्याला पाळायचा असल्याचं शिवसेना नेत्यांकडून सांगण्यात आलं. अशातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांची भेट घेतली. या भेटीवरुनच उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर नाव न घेता अप्रत्यक्ष टीका केलीयं.
