Udhav Thackeray : देवेंद्रजी आपली युती होती तेव्हा..,; उद्धव ठाकरेंनी सांगितला जुना किस्सा!

बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यंगचित्रकलेची ताकद किती अफाट होती, याचा एक खास किस्सा उद्धव ठाकरे यांनी सांगितला.

Devendra Fadanvis

Devendra Fadanvis

Udhav Thackeray : मुंबईत एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसेप्रमुख राज ठाकरे आणि ठाकरे सेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे हे एकाच मंचावर पाहायला मिळाले. या कार्यक्रमात तिन्ही नेत्यांनी भाषणं केलीय. उद्धव ठाकरेंनी यावेळी व्यंगचित्राबद्दलचे अनेक किस्से सांगितले आहेत.

उद्धव ठाकरे म्हणाले, देवेंद्रजी आपली युती होती तेव्हा. नुकतीच सामनाची सुरुवात झाली होती. रामकृष्ण हेगडे हे तेव्हा कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. तिथे मराठी माणसांवर अत्याचार सुरुच होते. तेव्हा एक चित्र काढायचे होते. ज्यामध्ये म्हेशासुरमर्दिनी एका राक्षसाला मारताना दाखवणारं ते चित्र असणार होतं. पण त्याला चेहरा हा रामकृष्ण हेगडेंचा दाखवायचा होता. पण ते चित्र हे व्यंगचित्र नव्हतं. तर कर्मचाऱ्यांना चांगलं चित्र काढलं पण त्यांनी सांगितलं की, रामकृष्ण यांचा या अँगलने त्यांचा फोटो सापडत नाही. आता पडलेल्या रामकृष्ण हेगडेंचा चेहरा मिळणार कसा? त्यावेळी काय करायचं अडचण आली. बाळासाहेबांनी विचारलं काय झालं? मग मी सांगितलं की अशी अशी अडचण आली आहे. तेव्हा बाळासाहेब म्हणाले की, घेऊन ये, त्यांनी पेन्सिल घेतली आणि काही सेकंदांमध्येच हेगडेंचा पडलेला चेहरा काढून दिला आणि सांगितलं की जा आता रंगवायला सांग.

त्यामुळे एवढी भारी कमांड त्यांची व्यंगचित्रावर होती. यामध्ये सर्वात महत्त्वाचं हे आहे की ज्यांची आपण चित्र काढतोय, त्यांना हे कळलं पाहिजे, स्वतःपूरत काढणार असाल तर लोकांना कशाला दाखवता. दिवाळीचा फराळ म्हणजे अनेक चित्र बाळासाहेबांनीही काढली आहेत.

यावेळी उद्धव ठाकरेंनी आणखी एक आठवण सांगितली. वसंतराव नाईक तेव्हा मुख्यमंत्री होते. तेव्हा बंगल्यांच्या नावानीशी मंत्र्याची एक एक कॅरेक्टर त्यांनी काढली होती. त्यांच्याकडे एवढी खाती होती. त्यांच्यावर मंत्रीपदावरती वर्षाव होतोय, असं त्यात दाखवलं होतं. बाळासाहेबांनी मेघदुत असं एक व्यंगचित्र काढलं होतं. त्यातून त्यांनी मंत्र्यांना टोला लगावला होता. असे व्यंग निर्माण झाले पाहिजेत पुढच्या शंभर वर्षांच्या इतिहासा आजपासून सुरुवात करा असं यावेळी उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

Exit mobile version