Udhhav Thackeray Criticize and demand to PM Modi for Help to Flood Victims : राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यात अनेक शेतकऱ्यांची पिकं पुर्णत: वाहून गेले आहेत. त्यामुळे राज्यभरातून सरकारकडे ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जात आहे. त्यावर आता उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार नुकसान भरपाई तसेच संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई! राकेश किशोर यांची प्रॅक्टिस स्थगित
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आठ आणि नऊ ऑक्टोबर रोजी दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत.यावेळी मुंबईमध्ये त्यांच्या हस्ते विविध विकास कामांची उद्घाटन होणार आहेत.त्याच वेळी मराठवाड्यातील तसेच राज्यातील इतर भागातील पूरग्रस्तांसाठी पंतप्रधान कोणते विशेष पॅकेज जाहीर करतात याकडे सर्वांचे लक्ष लागला आहे.
दसरा, दिवाळी ते लग्न सराई, 14 लाख कोटींचं फेस्टीव सिझन! धक्कादायक अहवाल…
त्यामुळे पंतप्रधानांच्या या दौऱ्याचा लाभ पूरग्रस्तांना व्हायला हवा अशी मागणी ठाकरे यांनी केले आहे. यासाठी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे.त्या पत्रामध्ये त्यांनी ठणकावून सांगितले आहे की,संपूर्ण मराठवाडा आजही चिखलात आणि पाण्यात आहे पिक घर पशुधन यासह संपूर्ण जमीन खरडून गेली आहे.त्यावर किमान दोन पिढ्या पीक घेता येणार नाही.
सोन्याने रेकॉर्ड मोडलं! 10 ग्रॅम सोन्याची किंमत 1.20 लाख रुपयांवर
अशा परिस्थितीमध्ये 40 लाख शेतकऱ्यांच्या साठ लाख एकर शेतीला भटका बसलेला आहे. पंतप्रधानांनी केवळ पॅकेजची धूळ फेक न करता हेक्टरी 50 हजार रुपये थेट मदत तसेच कर्जामध्ये बुडालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर करावी. कारण या शेतकऱ्याला मदतीचा हात मिळाला नाही.तर त्यांच्या तीन पिढ्या नष्ट होतील.त्यामुळे पूरग्रस्त शेतकऱ्यांकडून मी हात जोडून विनंती करतो की,थातूरमातूर घोषणा न करता शेतकऱ्यांना जे हवं आहे ते द्या.