निवडणुकीत राज्यामध्ये पैशांचा धूर; ठाकरे सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची चौफेर फटकेबाजी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहतायेत. निवडणुकीत सत्तेत सोबत बसलेले घटक पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत.

Untitled Design (10)

Untitled Design (10)

Udhhav Thackrey Press Conferance : सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहतायेत. या निवडणुकीत सत्तेत सोबत बसलेले घटक पक्ष भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. आपल्याकडं अर्थमंत्रीपद असल्याचं सांगून मत मागण्याची वेळ उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर आली आहे. भाजपचे नेते त्यांना प्रत्यत्तर म्हणून म्हणत आहेत की तिजोरी जरी तुमच्याकडं असली तरी मालक आमच्याकडे आहे. अशातच शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी मालवणमध्ये भाजप पदाधिकारी विजय केनवडेकर यांच्या घरी धाड टाकली आणि लाईव्ह शूटिंग करत त्यांच्या घरात 20 लाख रुपये असल्याचं दाखवलं होतं. त्यानंतर आज परत अजित पवार गटाच्या महिला कार्यकर्त्या पैशांनी भरलेली पाकिटं वाटत असल्याचा आरोप करत शिंदेसेनेने या महिला कार्यकर्त्यांना रंगेहात पकडल. या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर विरोधक महायुतीवर तुटून पडलेत. एकंदरीत या निवडणुकीत पैशांचा धूर पाहायला मिळतोय असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Udhhav Thackrey) यांनी केलाय.

निवडणुकीच्या रणसंग्रामावरून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना देखील अप्रत्यक्ष टोला लगावलाय. ते म्हणाले की मुख्यमंत्री आणि त्यांचे दोन सहकारी आणि सगळं मंत्रिमंडळ गावागावात प्रचारासाठी फिरत आहे. मी सहकारी म्हणतोय, कारण उपमुख्यमंत्री हे पद संविधानिक नाही. राज्यात मोठ्या प्रमाणात पैशांचा धूर दिसत आहे,एकप्रकारे सत्तेचा माज या राज्यकर्त्यांच्या वक्तव्यातून आणि वागणुकीतून संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय. यावेळी ते म्हणाले की, मी 8 ते 10 दिवसांपूर्वी मराठवाड्यात शेतकऱ्यांसोबत जाऊन बसलो होतो, तेव्हा त्यांचं दुःख, वेदना आणि व्यथा आणि समजून घेण्याचा प्रयत्न केला. तसंच त्यांना धीर देखील दिला. राज्यातील एकही मंत्री शेतकऱ्यांसोबत जाऊन बसत नाही. नागरिकांशी संवाद देखील साधत नाहीत. फक्त तिथं जातात जिथं पैशांच्या थैल्या उघडल्या जातात आणि मतं मागितली जातात.

घार हिंडते आकाशी चित्त तिचे पिलापाशी, कोपरगावकर आम्हाला साथ देतील, आशुतोष काळेंना विश्वास

त्याचप्रमाणे हे जे इथोपियाचा हवाला देऊन म्हणतायेत मुंबईची हवा दूषित झाली. तर त्याचा काहीही संबंध नसून इथं भ्रष्टाचाराचे ढग पाहायला मिळत आहेत. मी मुख्यमंत्री झाल्यावर आरेला परवानगी नाकारली आणि ती कांजूरला दिली. मात्र आता या सरकारने ती जागा घेतली, झाडे कापल्यामुळे आणि अनप्लॅन्ड बांधकामामुळे प्रदूषण वाढलंय. यावेळी त्यांनी प्रयागराज येथे झालेल्या कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीवर देखील भाष्य केलंय. नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी ज्या तपोवनात झाडांची कत्तल करण्यात येणार आहे. त्याला आमचा विरोध असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं. आहे ते मारून टाकायचं आणि मारल्यानंतर पुन्हा एकदा लावू असं म्हणायचं, हा थापा मारायचा प्रकार आहे. हि सगळी जागा अदानीच्या घशात घालण्यासाठी हा सगळं प्रकार सुरू असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. झाडी टाकून पैसे दाखवले तरी सगळे चिडीचूप आहेत. मुह मे राम, बगल मे अदानी असा हा सगळं प्रकार आहे. आमचा विरोध हा कुंभमेळ्याला आणि साधुग्रामला नाही. पण हजारो झाडांची कत्तल करून सरकार आपल्या पदरात पुण्य पडून घेत आहे याला आमचा विरोध आहे.

Exit mobile version