Download App

मी अनेक गुन्हेगारांच्या विरोधात लढलोय, राजकारणात नवीन म्हणून अडवे-तिडवे प्रश्न विचारू नका; निकमांची पत्रकार परिषद

पुनम महाजन यांच लोकसभा तिकीट कापून सरकारी वकिल उज्वल निकम यांना उत्तर मध्य मुंबईमधून भाजपने लोकसभेची उमेदवारी दिली आहे.

  • Written By: Last Updated:

BJP nominates Ujjwal Nikam : राजकीय क्षेत्रात नवीन आहे म्हणून मला राजकीयदृष्या अडवे-तिडवे प्रश्न लगेच विचारू नका. (Ujjwal Nikam) मी अनेक गुन्हेगारांच्या विरोध लढलोय. माझं बोलणं खूप कडवं आहे. आपल्याला येणाऱ्या काळात कळेलच असं म्हणत वकिल उज्वल निकम यांनी राजकारणातही आपण जोरदार फटकेबाजी करणार असल्याचं अप्रत्यक्ष सांगितलं आहे. ते भाजपकडून उत्तर मध्य मुंबईतून उमेदवारी मिळाल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलत होते.

 

लोकांच्या उत्पन्न वाढीसाठी काम करणार

या लोकसभेतून स्व. मनोहर जोशी, तसंच, तरूण खासदार पुनम महाजन यांनीही येथून चांगलं काम केलं आहे. आता येथून मला संधी मला मिळाली आहे. देशात जे नवीन कायदे येतील त्या माध्यमातून देशाची सुरक्षितता, सामान्य लोकांचं उत्पन्न कसं वाढेल यासाठी माझे प्रयत्न राहतील. तसंच, या देशात वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक आहेत. त्या माध्यमातून मी काम करणार आहे असंही निकम म्हणाले आहेत.

 

महाजन यांना भेटणार

आपण पुनम महाजन यांना भेटणार का? या प्रश्नावर निकम म्हणाले, पुनम महाजन आणि आमचे कौटुंबीक संबंध राहीले आहेत. प्रमोद महाजन यांची हत्या झाल्यानंतर पुनम महाजन, पंकजा मुडे या मला कायम भेटत राहिल्या. त्यांचे आणि आमचे संबंध चांगले आहेत. तसंच, पुनम महाजन यांच खासदार म्हणून कामही चांगलं राहीलं आहे असंही निकम यावेळी म्हणाले.

 

निकमांनी जोडले हात

यावेळी येणाऱ्या काळात तुमचही मला सहकार्य राहुद्या असं आवाहन निकम यांनी पत्रकारांना केलं. तसंच. येणाऱ्या मोदी सरकारमध्ये कायदा मंत्री हा उत्तर मुंबई मध्यमधून असेल का? या प्रश्नावर निकम यांनी काय म्हणता म्हणून पुन्हा विचारलं. परंतु, त्यावर पत्रकारांना काहीही उत्तर न देता त्यांनी हात जोडले.

follow us