Download App

Ulhas Bapat : ‘SC चा निकाल येण्याआधी निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय ही मोठी चूक’

  • Written By: Last Updated:

मुंबई : मागील काही महिन्यांपासून शिवसेना (Shiv Sena) पक्षाचे नाव आणि पक्षाचे चिन्ह यावरून सुरू असलेल्या संघर्षात केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) काल एकनाथ शिंदेच्या (Eknath Shinde) बाजूने निर्णय दिला. हा निर्णय म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. यातच निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येण्याअगोदर आपला निकाल द्यायला नको होता. निर्णय देऊन निवडणूक आयोगाने गंभीर चूक केली आहे, असं विधान ज्येष्ठ घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी व्यक्त केले आहे.

निवडणूक आगोगाने काल दिलेल्या निर्णयावर उल्हास बापट म्हणाले की, निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय म्हणजे राजकीय भूकंप आहे. या निर्णयाचे काय परिणाम होणार, या निर्णयाचा फायदा तसेच तोटा किती झाला, हे काळच ठरवेल.  निवडणूक आयोगाने हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागण्याआधी द्यायला नको होता. निवडणूक आयोगाकडे एवढी तरी परिपक्वता असायला हवी होती, असे टीका बापट यांनी केली.

दरम्यान, निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येऊ शकते. या सर्व गोष्टींचा विचार सर्व राजकीय पक्षांनी केला पाहिजे. आज हे सत्तेवर आहेत, उद्या दुसरे सत्तेवर असतील. त्यामुळे तात्पुरता विचार करू नये. तर भारतीय लोकशाही कशी सुदृढ होईल, याचा गांभीर्याने विचार करणं गरजेंच असल्याचं बापट यांनी सांगितलं आहे.

Pune By Election: मी मरणार, बावनकुळे यांच्या वक्तव्याचा अजित पवारांकडून समाचार

ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालय आगामी चार ते पाच दिवसांत आमदारांच्या अपात्रतेबाबतच्या खटल्याचा निकाल देऊ शकते. सध्याचे पाच सदस्यीय घटनापीठ हे आमदारांच्या अपात्रतेचा तसेच विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारांबाबतचा खटला कोणत्याही क्षणी सात सदस्यीय घटनापीठाकडे पाठवण्याचाही निर्णय घेऊ शकते.

पाच सदस्यीय घटनापीठाने हे प्रकरण सात न्यायमूर्तींच्या खंडापीठाकडे पाठवले तर हा खटला वर्षभर चालेल. मात्र, सध्याच्याच पाच न्यायमूर्तींनी या खटल्यावर निकाल दिला आणि तो आयोगाने दिलेल्या निकालाच्या विरोधात लागला, तर मग गंभीर परिस्थिती निर्माण होईल. निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाच्या अगोदरच हा निर्णय देऊन गंभीर चूक केली, असे उल्हास बापट म्हणाले.

Tags

follow us