Pune By Election: मी मरणार, बावनकुळे यांच्या वक्तव्याचा अजित पवारांकडून समाचार

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out (25)

पुणे : चिंचवड आणि कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या मतदानासाठी आता काही दिवसच शिल्लक असल्यामुळे सर्वच पक्षांच्या प्रचारात जोर चढू लागला आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी चिंचवड येथे एका बैठकीत अजित पवारांना 440 व्होल्ट करंट लागला पाहीजे असे म्हणत अजित पवारांवर टीका केली होती.

या टीकेचा आज अजित पवार यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. अजित पवार म्हणाले मी 440 व्होल्टचा करंट लागून मरणार  आहे. मी मेल्यावर माझा कार्यकर्त्यांना मला श्रद्धांजली वाहावी लागणार आहे. बोलण्याची संधी मिळाली म्हणून कोणी काहीही बोलू नये असा टोला अजित पवारांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना लगावला.

Uddhav Thackeray ची ‘ती’ एक चूक; शिवसेना नावासह चिन्ह गमावले 

काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “अश्विनी जगताप यांच्या विरोधात जे निवडणूक लढवत आहेत, त्यांच्या विरोधात अश्विनीताई यांच्यासमोरचे बटण इतक्या जोरात दाबा की, ४४० व्होल्ट करंट लागला पाहीजे. असा करंट लागला पाहीजे की, अजित पवारांनी पुन्हा चिंचवडचे नाव काढले नाही पाहीजे. हा करंट देण्याची ताकद या व्यासपीठावर बसलेल्या लोकांची आहे. ही करंट देण्याची ताकद भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. हा करंट का दिला पाहीजे? कारण लक्ष्मण जगताप यांच्यासारख्या आमदाराचे निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नी निवडणुकीसाठी उभ्या आहेत. अशावेळी त्यांच्याविरोधात निवडणूक लढविणाऱ्यांना हृदय आहे की नाही, माणुसकी आहे की नाही? खरंतर असा लोकांना जागा दाखविण्याची गरज आहे.”

Tags

follow us