Download App

बारामतीत काका-पुतण्यात फाईट? युगेंद्र पवार म्हणाले, त्यांची इच्छा…

Yugendra Pawar On Maharashtra Assembly Election : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) फुटीनंतर राज्यातील राजकारणात बारामती मतदारसंघ

  • Written By: Last Updated:
Image Credit: letsupp

Yugendra Pawar On Maharashtra Assembly Election : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) फुटीनंतर राज्यातील राजकारणात बारामती मतदारसंघ (Baramati Constituency) चर्चेचा विषय बनला आहे. या मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) सुप्रिया सुळे (Supriya Sule) विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्यात लढत झाली होती.

तर आता आगामी विधानसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार (Yugendra Pawar) अशी लढत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) अनेक कार्यकर्त्यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेऊन विधानसभा निवडणुकीमध्ये बारामती मतदारसंघातून अजित पवार यांच्या विरोधात युगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. यातच आता युगेंद्र पवार यांनी एका मुलाखतीमध्ये विधानसभा निवडणुकीवर भाष्य केले आहे.

युगेंद्र पवार म्हणाले, कार्यकर्त्यांनी शरद पवारांची भेट घेतली हे मला माहिती नव्हते, त्यांनी त्यांची मागणी व्यक्त केली आहे. त्यांनी त्यांची इच्छा व्यक्त केली आहे. कार्यकर्त्यांना आपण थांबवू शकत नाही किंवा नंतर त्यांना काही बोलू देखील शकत नाही. निवडणुकीच्या काळात त्यांनी खूप कष्ट घेतले आहे आणि कामे केली आहे.

मी देखील गेल्या चार वर्षांपासून विविध स्थळावर काम करत आहे मात्र मीडिया समोर येत नव्हतो किंवा पक्ष कार्यलयात जात नव्हतो मात्र लोकसभा निवडणुकीत पक्षाला गरज होती त्यामुळे मी जास्त लक्ष घालत आहे असं युगेंद्र पवार म्हणाले.

युगेंद्र पवार पुढे म्हणाले, लोकसभेत आमची भूमिका होती निवडणुकीत कुटुंब विरुद्ध कुटुंब अशी लढत नाही झाली पाहिजे मात्र ती झाली. यावेळी देखील आमची हीच भूमिका आहे मात्र पुढे बघू काय होतो असं म्हणत त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत उतरण्याचे संकेत दिले. तसेच बारामती शहराचा विकास झाला आहे मात्र ग्रामीण भागात विकास होणे आवश्यक आहे असं देखील ते म्हणाले.

तर दुसरीकडे समोर आलेल्या माहितीनुसार, शरद पवार यांनीही युगेंद्रसह कार्यकर्त्यांशी बोलणे सुरू केले आहे. शरद पवार बारामतीचे राजकीय मैदान युगेंद्रसाठी तयार करत असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होत आहे.

Sunetra Pawar : मोठी बातमी! सुनेत्रा पवार राज्यसभेवर बिनविरोध

कोण आहेत युगेंद्र पवार?

युगेंद्र पवार अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव आहे. शरयु ग्रुपच्या माध्यमातून युगेंद्र पवार व्यवसायामध्ये सक्रिय असून शरयू शुगर कारखानाचे काम युगेंद्र पवार पाहतात तसेच ते बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष देखील आहे मात्र त्यांना या पदावरून काढल्याची चर्चा आहे.

follow us

वेब स्टोरीज