Download App

विकसित भारतासाठी राजकारणात या; पुण्यात केंद्रीय मंत्र्यांचं तरूणांना आवाहन

  • Written By: Last Updated:

Rammohan Naidu Kinjarapu In Student Parliament At MIT : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी सांगितल्याप्रमाणे देशाला एक लाख युवा लोकप्रतिनिधींची आवश्यकता आहे. राजकारणात उच्चशिक्षित आणि चारित्र्यवान उमेदवार आले नाही, तर पुन्हा वाईट प्रवृत्तीचे लोकप्रतिनिधी येतील. आपलं संविधान सर्वोच्च आहे. आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार (Pune News) मिळालाय. संविधानाने आपल्या सर्वांना समान हक्क आणि मूलभूत अधिकार दिलेत. त्यामुळे पुढे येऊन विकसित भारताच्या निर्मितीसाठी जबाबदारी घ्या. लोकसेवा करण्यासाठी राजकारणात या, असं आवाहन केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू किंजरापू यांनी (Union Minister Rammohan Naidu Kinjarapu) भारतीय छात्र संसदेतील देशभरातील युवा प्रतिनिधींना केलंय.

देशात उत्कृष्ट विमानसेवा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. त्यासाठी आवश्यक असणार्‍या पायाभूत सुविधा उभारणीचे काम वेगाने सुरू आहेत. येत्या काही दिवसात तुम्हाला विमानसेवा क्षेत्रात अमूलाग्र बदल झालेले दिसतील, असं देखील आश्वासन केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी दिलंय.

डोनाल्ड ट्रम्पने भारतीय बाजार पाडला! एका निर्णयाने बीएसई स्मॉलकॅप हजार अंकांनी घसरला

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे आणि एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्मेंट, पुणे (Pune) यांच्या वतीने आयोजित 14 व्या भारतीय छात्र संसदेच्या तिसर्‍या सत्रात ‘भारतीय संस्कृती की पाश्चात्य ग्लॅमर : भारतीय युवकांची कोंडी’ या विषयावर नायडू बोलत होते. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक डॉ. विश्वनाथ दा. कराड होते. यावेळी हिमाचल प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष कुलदीप सिंह पठानिया, लोकसभेच्या माजी अध्यक्ष सुमित्रा महाजन, खासदार अरूण गोविल, ज्येष्ठ अभिनेत्री खुशबू सुंदर, माजी केंद्रीय मंत्री सी. पी. जोशी, आचार्य शिवम, भारतीय छात्र संसदेचे संस्थापक आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल कराड, कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस उपस्थित होते.

राममोहन नायडू किंजरापू म्हणाले की, भारतातील युवा पिढीचा जगात दबदबा आहे. ही पिढी विकसित भारताचा कणा आहे. केंद्रीय मंत्री म्हणून भारतातील युवा पिढीबाबत मला आदर आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या विचारांनी आणि शिकवणीने युवा पिढीचे कल्याण होणार आहे. वडिलांचे निधन झाल्यानंतर, माझ्या कुटुंबावर आणि तेलगू भाषिक जनतेवर प्रचंड दुःखाचा डोंगर आमच्यावर कोसळला होता. मात्र, हार न मानता जबाबदारी घेण्याचे ठरविले आणि कामाला सुरुवात केली. मतदारसंघातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासोबतच, त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यात यशही आले. त्यामुळे मतदारसंघातील नागरिकांनी मला तिसर्‍यांदा निवडून दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्यावर विश्वास टाकत, मला केंद्रीय मंत्री केले. त्यामुळे माझ्यावर मतदार संघातील आणि देशातील नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी असून, ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे, तसेच, सुमित्रा महाजन यांनी एका आईप्रमाणे माझी काळजी घेतली. मला वेळोवेळी मार्गदर्शन केले.

शर्वरीचा समुद्रकिनाऱ्यावर टायर फ्लिप वर्कआउट; ‘अल्फा’च्या एक्शन शेड्यूलसाठी तयारी सुरू!

खुशबू सुंदर म्हणाल्या की, भारताला विकसित बनविण्याचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिलंय. राष्ट्रीय एकात्मतेला प्राधान्य दिले पाहिजे. आम्ही भारतीय हे दोन शब्दच आपली सभ्यता आणि संस्कृती जगासमोर आणतात. भारतातील युवा पिढी उद्याचे भविष्य आहे. अरुण गोविल म्हणाले की, संस्कृती ही हृदयात असते. असे असतानाही आई- वडिलांकडून पाश्चात्य संस्कृती आपल्याला लहानपणीपासून दिली जाते. भारतीय संस्कृती आत्मसात केल्यावरच, आपला देश विश्वगुरू होणार.

कुलदीप सिंह पठानिया म्हणाले, युवा पिढीने पाश्चिमात्य संस्कृती किंवा भारतीय संस्कृती या दोन्ही संस्कृतीमधील चांगल्या गोष्टी घ्याव्यात. हे करीत असताना, भारतीय संस्कृतीला अजिबात विसरून चालणार नाही. डॉ. राहुल कराड यांनी भारतीय छात्र संसदेच्या आयोजनाचा उद्देश सांगत, देशात सक्षम लोकशाहीच्या निर्मितीसाठी युवा पिढीला शिक्षण आणि प्रशिक्षणाची आवश्यकता असल्याचं सांगितलं.

 

follow us