ट्रेनी IAS अधिकाऱ्याचा माज लोकांनी क्षणात उतरवला… हात जोडून मागितली माफी
![ट्रेनी IAS अधिकाऱ्याचा माज लोकांनी क्षणात उतरवला… हात जोडून मागितली माफी ट्रेनी IAS अधिकाऱ्याचा माज लोकांनी क्षणात उतरवला… हात जोडून मागितली माफी](https://images.letsupp.com/wp-content/uploads/2025/02/Madhya-Pradesh_V_jpg--1280x720-4g.webp)
Congress MLA Accuses Trainee IAS Officer : एका ट्रेनी IAS अधिकाऱ्याचा माज लोकांनी क्षणात उतरवल्याचं समोर आलंय. ही घटना मध्य प्रदेश राज्यात घडली आहे. मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) मांडला जिल्ह्यात एका प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी आणि एसडीएम अकीप खान यांना घेरल्याची घटना समोर आलीय. गावकऱ्यांमुळे, आयएएस त्यांच्या सरकारी वाहनातच अडकले (Trainee IAS Officer) होती. घटनेची माहिती मिळताच आणि पोलिसांना घटनास्थळी पोहोचताच ग्रामस्थांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. पोलिसांच्या उपस्थितीत, एसडीएमना गावकऱ्यांची माफी मागावी लागली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल (Viral) होतोय. नक्की काय प्रकरण होतं, ते आपण सविस्तर पाहू या.
Delhi Election : काँग्रेसचे 70 पैकी 67 उमेदवार लाजही वाचवू शकले नाहीत… डिपॉझिट जप्त कधी होते?
व्हायरल व्हिडिओमध्ये एसडीएम अकीप खान गावकऱ्यांना सांगताना दिसत आहेत की, गोठ्याच्या बांधकामासाठी माती आणली जात असल्याचं समोर आलंय. जर तसं असेल तर तुम्ही आधी परवानगी घ्यायला हवी होती. जर परवानगी घेतली असती तर काहीच अडचण आली नसती. झालेल्या गैरसमजाबद्दल मी तुम्हा सर्वांची माफी मागतो. या घटनेबाबत जेसीबी चालकाने घुघरी पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे.
काँग्रेस पक्षाचे प्रादेशिक आमदार नारायण सिंह पट्टा यांनी या घटनेबाबतचा व्हिडिओ प्रसिद्ध केलाय. यामध्ये आमदार आरोप करत आहेत की, गावातील एक मुलगा गोठ्यासाठी माती खोदत होता. एसडीएमना पाहून तो पळून गेला. एसडीएमने त्याचा पाठलाग केला आणि त्याच्या जुन्या घरापर्यंत पोहोचले. त्याने तिथे ड्रायव्हरशी गैरवर्तन केले. यावेळी त्यांच्या वृद्ध आई आणि वहिनींना या घटनेमुळे मोठा बसलाय, असं तिथले आमदार सांगत आहेत.
दुसऱ्याच्या झेंड्यावर आम्ही पंढरपूर करत नाही; खासदार लंकेंचा आमदार दातेंवर निशाणा
याप्रकरणी आमदार म्हणाले की, जर काही चूक झाली असती तर एसडीएमने कारवाई केली असती. अशा प्रकारे लढणं योग्य नाही. आता आमदाराने एसडीएमवर कारवाईची मागणी केलीय. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर अतिरिक्त जिल्हाधिकारी अरविंद सिंह म्हणाले की, एसडीएम आकिप खान कुठेतरी दौऱ्यावर जात होते. जेव्हा त्यांना बेकायदेशीर उत्खनन होत असल्याचे दिसलं. त्यांनी ते थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु चालक जेसीबी घेऊन पळून जाऊ लागला. त्यानंतर एका ठिकाणी हा ड्रायव्हर जेसीबी सोडून एका घरात गेला. त्यावरून वाद झाला. गावकऱ्यांनी एसडीएमच्या गाडीला घेराव घातला. सध्या त्यांना जिल्हा मुख्यालयात सुरक्षितपणे आणण्यात आलंय. या प्रकरणाची चौकशी केली जाईल. बिछिया एसडीओपी अर्चना अहिर देखील सर्व पक्षांची चौकशी केल्यानंतर तपासाबद्दल बोलत आहेत.