Delhi Election : काँग्रेसचे 70 पैकी 67 उमेदवार लाजही वाचवू शकले नाहीत… डिपॉझिट जप्त कधी होते?

Delhi Election : काँग्रेसचे 70 पैकी 67 उमेदवार लाजही वाचवू शकले नाहीत… डिपॉझिट जप्त कधी होते?

Delhi Election 2025 Result : दिल्लीत नुकताच विधानसभा निवडणुकांचा निकाल (Delhi Election 2025) जाहीर झालाय. महाराष्ट्राप्रमाणेच दिल्लीत सुद्धा भाजपने बाजी मारल्याचं पाहायला मिळालंय. तर आप अन् कॉंग्रेस मात्र पिछाडीवर आहेत. यासोबतच एक धक्कादायक बातमी समोर येतेय. कॉंग्रेसला (Congress) या विधानसभा निवडणुकीत 70 पैकी केवळ तीन जागांवर आपलं डिपॉझिट वाचवण्यात यश मिळालंय. एकेकाळी दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या नेतृत्वाखाली 15 वर्षे कॉंग्रेसची सत्ता होती, परंतु आता या निवडणुकीत (Delhi Election 2025) मात्र 67 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालंय.

सलग तिसऱ्यांदा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाला आपलं खातं देखील उघडता आलेलं नाही. काँग्रेसने आपल्या कामगिरीबद्दल निराशा व्यक्त केलीय. तसेच पुन्हा पाच वर्षांनी सत्तेत येणार, असा दावा देखील कॉंग्रेस नेत्यांनी केलाय.

डिपॉझिट भरण्याचा कायदा काय?
लोकप्रतिनिधी कायदा, 1951 नुसार जी व्यक्ती उमेदवार म्हणून लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीसाठी उभी राहत असेल, त्या व्यक्तीला निवडणूक आयोगाकडे ठराविक रक्कम जमा करावी लागते. याच रक्कमेला डिपॉझिट म्हणतात. वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये ही रक्कम वेगवेगळी असते. ठराविक प्रमाणात मतं न मिळाल्यास डिपॉझिट जप्त होतं. म्हणजेच भरलेली रक्कम परत केली जात नाही. प्रत्येक एकूण मतदानाच्या 16.66 टक्के मतं मिळवणं आवश्यक असतं. याउलट 1/6 टक्के मतं मिळवणाऱ्या उमेदवाराला डिपॉझिटची रक्कम परत केली जाते. तसेच विजेत्या उमेदवारालाही आणि अर्ज मागे घेणाऱ्यांनाही ही रक्कम परत केली जाते.

वाहनधारकांसाठी मोठी बातमी! टोलचं झंझट कायमचं मिटणार, सरकार ‘या’ योजना आणण्याच्या तयारीत

काँग्रेस कोणत्या जागांवर डिपॉझिट वाचवू शकेल?

दिल्लीत आपलं डिपॉझिट वाचवण्यात यशस्वी राहिलेल्या तीन काँग्रेस उमेदवारांमध्ये प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष देवेंद्र यादव यांचा समावेश आहे. त्यांना 40 हजारांहून अधिक मते आणि 27 टक्क्यांहून अधिक मते मिळाली. ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत. जर एखाद्या उमेदवाराला एकूण मतदानाच्या किमान एक षष्ठांश मते मिळाली नाहीत, तर त्याने निवडणूक आयोगाकडे सुरक्षा म्हणून जमा केलेली रक्कम जप्त केली जाते.

दिल्लीच्या कस्तुरबा नगर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार अभिषेक दत्त यांनीही त्यांचे डिपॉझिट वाचवले असून ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत. दिल्लीतील ही एकमेव जागा आहे, जिथे काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर आहे. दत्त यांना 27,019 मते मिळाली आणि भाजप उमेदवार नीरज बसोया यांच्याकडून 11,000 पेक्षा जास्त मतांनी त्यांचा पराभव झाला. त्यांना सुमारे 32 टक्के मते मिळाली.

दुसऱ्याच्या झेंड्यावर आम्ही पंढरपूर करत नाही; खासदार लंकेंचा आमदार दातेंवर निशाणा

नांगलोई जाट या जागेवर काँग्रेसला त्यांचे डिपॉझिट वाचवण्यात यश आले. येथून पक्षाचे उमेदवार आणि अखिल भारतीय काँग्रेस समितीचे माजी सचिव रोहित चौधरी यांना 31,918 मते आणि 20.01 टक्के मते मिळाली. ते तिसऱ्या स्थानावर आहे. तर संदीप दीक्षित, अलका लांबा, कृष्णा तिरथ, मुदित अग्रवाल, हारून युसूफ आणि राजेश लिलोथिया या नेत्यांचेही डिपॉझिट जप्त झालेत. नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आव्हान देणाऱ्या माजी खासदार दीक्षित यांना फक्त 4,568 मते मिळाली आणि ते तिसऱ्या स्थानावर राहिले. या जागेवर भाजप नेते प्रवेश वर्मा यांनी केजरीवाल यांचा 4,089 मतांनी पराभव केलाय.

1998 ते 2013 पर्यंत दिल्लीच्या राजकारणात सुवर्णकाळ पाहणाऱ्या काँग्रेससाठी ही सलग तिसरी विधानसभा निवडणूक होती, ज्यामध्ये त्यांना एकही जागा मिळाली नाही. या निवडणुकीत, आम आदमी पक्षाला भाजपकडून मिळालेल्या पराभवापेक्षा काँग्रेसला जास्त मते मिळाली, अशा 12 जागा आहेत. तर आपचे संयोजक नेते आणि माजी मुख्यमंत्री केजरीवाल यांना भाजपचे उमेदवार परवेश वर्मा यांच्याकडून 4,089 मतांनी पराभव पत्करावा लागला, तर काँग्रेसचे उमेदवार संदीप दीक्षित यांना या जागेवर 4,568 मते मिळाली.

2015 आणि 2020 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला खातेही उघडता आलं नाही. 1993 मध्ये दिल्लीत झालेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 14 जागा जिंकल्या होत्या, तर भाजपने 49 जागा जिंकून सरकार स्थापन केले होते. काँग्रेसचा सर्वोत्तम काळ 1998 ते 2013 हा होता. शीला दीक्षित यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने सलग तीन निवडणुका (1998, 2003 आणि 2008) जिंकल्या होत्या अन् सलग 15 वर्षे दिल्लीत सत्तेत होते.

1998 मध्ये काँग्रेसने 52 जागा, 2003 मध्ये 47 जागा आणि 2008 मध्ये 43 जागा जिंकल्या होत्या. आम आदमी पक्षाच्या उदयानंतर दिल्लीच्या राजकारणात काँग्रेसची घसरण सुरू झाली. 2013 च्या निवडणुकीत त्यांना फक्त 8 जागा मिळाल्या. काँग्रेसच्या या निराशाजनक कामगिरीबद्दल काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, काँग्रेसला चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. काँग्रेसचा प्रचार जोरदार झाला होता. ते विधानसभेत नसले, तरी पण दिल्लीत त्यांचे अस्तित्व नक्कीच आहे. लाखो काँग्रेस कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांनी 2030 मध्ये दिल्लीत पुन्हा एकदा काँग्रेसचे सरकार स्थापन होईल, असं आश्वासन त्यांनी दिलंय.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube