Download App

Sanjay Raut : दादा येणार, दादा बोलणार आणि दादा जिंकणार

Sanjay Raut on Ajit Pawar : अजितदादा इथं बसलेले आहेत. त्यांचं सगळ्यांना आकर्षण आहे. सकाळपासून एकच चर्चा दादा येणार का? आम्ही म्हणतो दादा येणार, दादा बोलणार आणि दादा जिंकणार, असे संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार आणि संजय राऊत यांच्यातील संबंध ताणले गेले होते. त्यानंतर अजित पवार यांनी संजय राऊत यांना आमच्या पक्षातील गोष्टीत लक्ष घालू नका असे सुनावले होते. आज मुंबईतील वज्रमूठ (Vajramooth rally) सभेतून संजय राऊत यांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

काल आणखी एक देशात इव्हेंट झाला. देशाचा एकमेव पंतप्रधान पाहिला गेल्या नऊ वर्षापासून फक्त मन की बात करतोय काम की बात करत नाही. मन की बात काय करता जनतेची बात करा. पण इथून पुढं वज्रमूठ फक्त काम की बात करील, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमावर केली आहे.

काल देशाचे गृहमंत्री अमित शहा मुंबईत आले होते. आता आहेत का नाही हे माहीत नाही बहुतेक सभेतून येऊन बसले असतील सभा पाहायला. ही ताकद पाहा, निष्ठा पाहा आणि आमची वज्रमूठही पाहा. आम्ही सर्व एक आहेत आणि एकत्रच राहाणार, असे खासदार संजय राऊत यांनी वज्रमूठ सभेतून भाजप नेत्यांना ठणकावून सांगितले.

उद्धव ठाकरे हृदयात, फिक्स मुख्यमंत्री करु, मुस्लिम शिवसैनिकाने रक्तानं लिहीले पत्र

आज सकाळी भाजपचे एक नेते सांगते की मुंबईतील सगळ्यात लहान मैदानावर सभा होतीय. त्यांना मी सांगू इच्छितो की तुझे डोळे चिनी आहेत. येऊन पाहा काय ताकद आहे. आज वज्रमूठ सभा प्रचंड आहे. जेवढी सभा गच्च भरली आहे त्यापेक्षा दुप्पट तिप्पट लोक बीकेसीच्या भोवती उभा आहेत. आजच्या सभेने निकाल दिला आहे. मुंबई महाराष्ट्राची, मराठी माणसाची आणि आमच्या बापाची, असे संजय राऊत म्हणाले.

Tags

follow us