धक्कादायक! खोपोली हत्याकांडाशी वाल्मीक कराडचं कनेक्शन; थोरवेंचे गंभीर आरोप

Khopoli massacre तील मंगेश काळोखे यांची हत्येबाबत आमदार थोरवेंनी मोठा दावा केला ज्यामुळे या प्रकरणाचं बीड कनेक्शन समोर आलं आहे.

Khopoli Massacre

Khopoli Massacre

Valmik Karad’s connection with Khopoli massacre Serious allegations by MLA Mahendra Thorave : शिवसेनेच्या खोपोलीतील नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची हत्या करण्यात आल्यानंतर या ठिकाणी राजकीय वातावरण तापलेलं आहे. त्यानंतर आता या प्रकरणामध्ये मोठा ट्विस्ट आला आहे. कारण आमदार महेंद्र थोरवे यांनी या प्रकरणातील आरोपीबाबत मोठा दावा केला आहे. ज्यामुळे या प्रकरणाचं बीड कनेक्शन समोर आलं आहे.

खोपोली हत्याकांडाशी वाल्मीक कराडचं कनेक्शन

काळोखे हे आमदार महेंद्र थोरवे यांचे जवळचे मानले जात होते. त्याबाबत थोरवे यांनी एक दावा केला आहे की, या प्रकरणातील मुख्य आरोपी रवी देवकर यांचा बॉडीगार्ड बीडचा आहे. त्यानेच काळोखेंवर 19 वार केले. त्याचे बीडमधील राजकीय नेत्यांशी संबंध आहेत. ज्यामध्ये धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांचा समावेश होतो.

राऊतांना उत्तर देणाऱ्या नवनाथ बनसह ‘यांना’ संधी; मुंबई मनपासाठी भाजपचे उमेदवार निश्चित

त्याचबरोबर थोरवे यांनी यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंवरही जोरदार टीका केली की, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून हे कृत्य झालेले असतानाही सुनील तटकरे कर्जामध्ये येऊन संबंधित आरोपीला पाठबळ देताना वाचवत आहेत.

नेमकं प्रकरण काय?

मंगेश काळोखे हे शुक्रवारी आपल्या मुलांना शाळेत सोडून दुचाकी वरून घरी परत होते. यावेळी एका काळ्या रंगाच्या कारमध्ये आलेल्या हल्लेखोरांनी त्यांना रस्त्यातच गाठलं त्यांच्यामध्ये वाद झाला आणि या वादाचा रूपांतर थेट हल्ल्यात झालं. हे हल्लेखोरांनी तलवार कोयता आणि कुऱ्हाडीने काळोखेंवर सपासप वार केले यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.

पवार काका-पुतणे दुसऱ्या दिवशीही एकत्र! वसंतदादा शुगर इन्स्टीस्ट्युटच्या सर्वसाधारण सभेला मुख्यमंत्रीही येणार?

या घटनेनंतर खोपोलीमध्ये संतापाची लाट असलेले आहे. काळोखे हे आमदार थोरवे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते. तर त्यांच्या पत्नी मानसि यांनी नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार उर्मिला देवकर यांचा 700 हून अधिक मतांनी पराभव केला होता. या पराभवाचा राग आणि जुन्या राजकीय वैरातूनच ही हत्या झाल्याचा आरोप यांच्या पुतण्याने केला आहे. 

Exit mobile version