Sujat Ambedkar on Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Maharashtra Navnirman Sena) यंदा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) आखाड्यात उतरणार आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) मुंबईबाहेर मराठवाडा आणि विशेषतः विदर्भात निवडणूक लढणार असून त्यासाठी त्यांनी जोरदार कंबर कसली. आता त्यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) मोर्चा उघडला. वंचितचे नेते सुजात आंबेडकरांनी (Sujat Ambedkar) राज ठाकरेंवर (Raj Thackeray) जोरदार टीका केली.
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया रहाटकर; तर, सदस्यपदी डॉ. अर्चना मजुमदार यांची नियुक्ती
सुजात आंबेडकर यांनी वाशिमला वंचितच्या उमेदवार मेघा डोंगरे यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. या सभेत बोलतांना त्यांनी सत्ताधारी आणि विरोधकांवर तोफ जोरदार तोफ डागली. त्यांनी थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर हल्लाबोल केला. सुजात आंबेडकर म्हणाले, मुस्लिमांसाठी फक्त वंचित बहुजन आघाडीच लढतेय, ते म्हणतात आम्ही मोठमोठे स्पीकर लावू. भोंगे लावून त्यावर हनुमान चालिसा वाजवू. मात्र, त्याला विरोध करून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा भोंगा उतरवण्याचं काम सर्वांत आधी वंचितचे कार्यकर्ते करतील, अशी टीका सुजात आंबेडकरांनी केली.
Saina Nehwal : बॅडमिंटनपटू सायना नेहवालचा स्टायलिश अंदाज
पुढं बोलतांना ते म्हणाले, जोपर्यंत चार-पाच मुस्लिम आमदार निवडून येत नाहीत, तोपर्यंत मुस्लिम समाजाचं भलं होणार नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेचे प्रस्थापित नेते आपचा विकास करू शकणार नाहीत. आपची एकच मागणी असली पाहिजे की, महाराष्ट्रात 15 टक्के मुस्लिम समाज आहे आणि जो पक्ष त्यांना 15 टक्के भागादारी देईल, 15 टक्के उमेदवारी देईल, त्यांनाच मतदान करून आपल्याला विजयी करायचं आहे, असं आंबेडकरांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीतही वंचित बहुजन आघाडीने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती. आताही वंचितने विधानसभा निवडणुकीत एकला चलो रे ही भूमिका घेतली. वंचितने आपल्या उमेदवारांच्या तीन याद्या जाहीर केल्या. वंचित बहुतांश मतदारसंघात आपले उमेदवार देत आहेत. त्यामुळं वंचितचा फटका नेमका कुणाला बसणार? हेच पाहणं महत्वाचं आहे.