Download App

Video : ‘मी मुख्यमंत्र्यांचंही ऐकत नसतो, सांगेल ते करायचे’; सत्ताधारी मंत्र्यांचा भलताच कॉन्फिडन्स

Tanaji Sawant News : सारखं कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असलेले आरोग्यमंत्री तानाजी सावंत(Tanaji Sawant) पुन्हा एकदा चांगलेच चर्चेत आले आहेत. तानाजी सावंतांनी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याही पुढे असल्याचं बोलले आहेत. आपण मुख्यमंत्र्यांचंही ऐकत नाही, नो डिस्कस, करायचे म्हणजे करायचे, मी सांगेल तेच करायचे अशा त्यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले आरोग्यमंत्री तानाजी सावंत सध्या धाराशिव दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान एका कार्यक्रमात सावंत यांनी धाराशिवचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्याशी संवाद साधत आहेत. या व्हिडिओमध्ये तानाजी सावंतांनी एक काम पोलिस अधीक्षकांना सांगितलं, त्यावर पोलिस अधीक्षक म्हणाले, डिस्कस करु, पण त्यावर नो डिस्कस, मी सांगितलं तर करायचं म्हणजे करायचं मी मुख्यमंत्र्यांचही ऐकत नाही तर बाकी काय, असं विधान तानाजी सावंत यांनी केलं आहे. यासोबतच पुन्हा उचलून फेकू, नंतरचे नंतर बघू असंही त्यांनी म्हटलं आहे.

Sanjay Raut: शिवसेना कोणाची हे पाकिस्तानला माहित पण…; संजय राऊतांची सडकून टीका

सत्तासंघर्षाच्यावेळी तानाजी सावंतही एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला गेले होते. त्यानंतर सावंतांवर मंत्रिपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. मंत्रिपदाची जबाबदारी सोपविण्यात आल्यानंतर तानाजी सावंत यांनी अनेकदा वादग्रस्त विधाने केल्याचं समोर आलं आहे. सावंत यांच्या आत्ताच्या विधानावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापुढे गेल्याचं दिसून येत आहे. ते शिंदे यांच्या आवाक्याबाहेर असल्याचंही बोललं जातंयं.

World Cup 2023 : जुन्या आठवणी पुन्हा ताज्या; यंदाही सेमीफायनलमध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड भिडणार!

एकंदरीत या प्रकराचा व्हिडिओ ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एक्सवर पोस्ट करीत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. सुषमा अंधारे पोस्टमध्ये म्हणाल्या, “गृहखात्याची अवस्था कोणीही यावं आणि टपली मारून जावं अशी झाली कधी कुख्यात गुन्हेगार गुंड पोलिसांना तालावर नाचवतात तर कधी सरकार दरबारचे मंत्री सरेआम इज्जत काढतात.. !!” अशी पोस्ट सुषमा अंधारे यांनी केली आहे.

दरम्यान, तानाजी सावंतांनी केलेल्या विधानानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या या विधानावर नेमकी काय भूमिका स्पष्ट करतील, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

follow us