खातं हसन मुश्रीफांकडे आणि प्रश्न मला…; तानाजी सावंतांनी दाखवलं मुश्रीफांकडे बोट
Tanaji Sawant : नांदेडच्या शासकीय रुग्णालयात (Nanded Government Hospital Death) 41 रुग्णांचा मृत्यू झाल्याप्रकरणी विरोधकांकडून सरकारवर जोरदार टीका होत आहे. सरकारच्या दुर्लक्षामुळेच हा प्रकार घडल्याचा आरोप विरोधक करत आहेत. आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी केली आहे. दरम्यान, रुग्णालयातील मृत्यूंना संपूर्ण मंत्रिमंडळच जबाबदार असल्याचे सावंत यांनी सांगितलं होतं. तर आज त्यांनी हसन मुश्रीफांकडे (Hasan Mushrif) बोट दाखवलं.
भारताच्या फिरकीपुढे कांगारुंचे लोटांगण, ऑस्ट्रेलिया 199 धावांवर ऑलआउट
शासकीय रुग्णालयात झालेल्या रुग्णांच्या मृत्यूनंतर सरकार आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झटत आहे. शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या काळात आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजले असे आरोप होत आहे. सावंत यांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधक करत आहे. थोडी जरी माणूसकी शिल्लक असेल तर मुख्यमंत्र्यांनी आरोग्य मंत्र्यांचा राजीनामा घ्यावी, अशी मागणी ठाकरे गटाने केली. यावरून तानाजी सावंत यांनीही विरोधकांवर जोरदार टीका केली आहे.
काल त्यांनी नांदेडच्या घटनेचा आरोग्य विभागाशी संबध नसल्याचं सांगितलं होतं. तर आज ते म्हणाले की, राज्यात ज्या काही मृत्यूच्या घटना घडल्या, त्यावरून माझ्यावर टीका होते. मात्र, हे खाते हसन मुश्रीफांकडे आहे आणि प्रश्नावली मात्र माझ्याकडे आली. हसन मुश्रीफ सेफ राहिले. अऩेकांनी माझ्यावर टीका केली की, कुठे आहेत ठेकेमंत्री असं म्हटलं. पण, मी मराठ्याची औलादा आहे. वार केला की, पलटवार करणारच, अशा शब्दात सावंत यांनी विरोधकांवर पलटवार केला.
यावेळी बोलताना तानाजी सावंत यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. तुम्ही दोन वर्षे सरकार फक्त फेसबुकवरून घरात बसून चालवले. तुमच्या बुद्धिमत्तेची, तुमची औकात काय आहे, हे आम्हाला माहिती आहे. तुम्हाला फोटो काढण्याशिवाय दुसरं काही येत नाही. तुम्ही दुर्देवाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालात. तुम्ही महाराष्ट्राला दहा वर्ष मागे नेलं, अशी घणाघाती टीका सावंत यांनी केली आहे.
नांदेडच्या संदर्भात मला कोणतेही प्रश्न विचारू नका. या सर्व प्रश्नांची उत्तरे मी उद्या मुंबईला जाऊन देणार आहे, असंही ते यावेळी म्हणाले. तसंच राज्य शासन दिवाळीपर्यंत आरोग्य संदर्भात एक अॅप लॉन्च करणार आहे. खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची होणारी पिळवणूक रोखण्यासाठी हे अॅप बनवले जात असल्याचं, सावंत यांनी सांगितलं.