भारताच्या फिरकीपुढे कांगारुंचे लोटांगण, ऑस्ट्रेलिया 199 धावांवर ऑलआउट

भारताच्या फिरकीपुढे कांगारुंचे लोटांगण, ऑस्ट्रेलिया 199 धावांवर ऑलआउट

World Cup 2023 : वर्ल्डकपचा पाचवा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चेन्नई येथे सुरु आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियाला भारताने 199 धावांवर ऑलआउट केले. भारताला विजयासाठी 200 धावांची गरज आहे.

ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथने सर्वाधिक 46 धावा केल्या. त्याने 71 चेंडूंचा सामना करताना 5 चौकार मारले. डेव्हिड वॉर्नरने 52 चेंडूत 41 धावा केल्या. वॉर्नरने 6 चौकार मारले. लॅबुशेनने 27 आणि मॅक्सवेलने 15 धावांचे योगदान दिले. पॅट कमिन्स 15 धावा करून बाद झाला.

अभिनेत्री करिश्मा तन्नाचा साडी स्वॅग, दक्षिण कोरियात टिपले सुंदर फोटो

या सामान्यात भारतीय फिरकीपटूंनी चमकदार कामगिरी केली आहे. रवींद्र जडेजाने 10 षटकांत 28 धावा देत 3 बळी घेतले. कुलदीप यादवने 10 षटकात 42 धावा देत 2 बळी घेतले. रविचंद्रन अश्विनला एक विकेट मिळाली. वेगवान गोलंदाज बुमराहने 2 बळी घेतले. हार्दिक पांड्या आणि मोहम्मद सिराजला प्रत्येकी एक विकेट मिळाली.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाची सुरुवात चांगली झाली नाही. झंझावाती फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला मिचेल मार्श खातेही न उघडता बाद झाला. जसप्रीत बुमराहने त्याला विराट कोहलीने झेलबाद केले. यानंतर स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरने दमदार सुरुवात केली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 69 धावांची भागीदारी केली. मात्र, चेंडू जुना झाल्यानंतर दोघांनाही धावा काढणे कठीण झाले.

राष्ट्रवादीच्या 9 आमदारांना मंत्रिपद मिळाल्यानं अन्याय झाला का? भरत गोगावले म्हणाले…

वॉर्नर 52 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने 41 धावा करून बाद झाला. तो त्याच्याच चेंडूवर कुलदीप यादवने झेलबाद झाला. यानंतर मार्नेल लॅबुशेन आणि स्टीव्ह स्मिथ यांच्यात 36 धावांची भागीदारी झाली, पण स्मिथ बाद होताच ‘तू चल मैं आया’च्या धर्तीवर ऑस्ट्रेलियन फलंदाज बाद झाला.

स्मिथने 71 चेंडूत पाच चौकारांच्या मदतीने 46 धावा केल्या. लॅबुशेन 41 चेंडूत 27 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर ग्लेन मॅक्सवेल 15, अॅलेक्स कॅरी 00, कॅमरून ग्रीन 08 आणि कर्णधार पॅट कमिन्स केवळ 15 धावा करू शकले.

अखेरीस मिचेल स्टार्कने 35 चेंडूत दोन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 28 धावा करत संघाची धावसंख्या 200 च्या जवळ नेली. तर अॅडम झम्पा 06 धावांवर आणि जोश हेझलवूड एका धावेवर नाबाद परतला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube