विधानपरिषद निवडणूक : अहिल्यानगरची लढत फिक्स; प्राजक्त तनपुरे विरुद्ध करण ससाणे भिडणार ?

Vidhan Parishad Election 2026- प्राजक्त तनपुरे उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे संकेत आहेत. तर काँग्रेसकडून करण ससाणे हे उमेदवार असू शकतात.

Vidhan Parishad Congress Vs Bjp

Vidhan Parishad Congress Vs Bjp

Vidhan Parishad Election 2026 : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थामधून विधानपरिषदेवर (Vidhan Parishad Election 2026) सदस्य पाठविण्याच्या निवडणुकीमध्ये जोरदार रस्सीखेच दिसून येत आहे. अहिल्यानगरच्या जागेची चित्र स्पष्ट होताना दिसत आहे. महायुतीमध्ये ही जागा भाजपला (BJP) जाईल, असे जागा वाटपाच्या वाटीघाटीतून स्पष्ट होत आहे. तर महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसच्या (Congress) वाट्याला आली आहे. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) हे उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे संकेत आहेत. तर काँग्रेसकडून श्रीरामपूरचे नगराध्यक्ष करण ससाणे (Karan Sasane) हे उमेदवार असू शकतात. ससाणे यांनी निवडणुकीची तयारी करत अपक्ष उमेदवारी दाखल केला आहे. त्यामुळे या मतदारसंघात दोघामध्ये लढत होण्याची शक्यता आहे.

मोठी बातमी! मी उपोषण करणारच, तुम्ही निघा; शिंदे समितीच्या नोंदींवरून संतप्त जरांगेंचा निर्धार कायम

पुण्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) मिळणार आहे. मात्र या बदल्यात मंत्रिमंडळातील एका महत्वाच्या खात्याची तडजोड झाली आहे. राष्ट्रवादीने अर्थखात्यावरील दावा सोडला आहे. तर नगरची जागाही भाजपला सोडण्यास राष्ट्रवादी काँग्रेस तयार झाली आहे. त्यामुळे ही जागा भाजपला मिळणार हे आता अंतिम झाले आहे. तर भाजपचे उमेदवार प्राजक्त तनपुरे हेच असणार आहे. कारण प्राजक्त तनपुरे हेच प्रबळ उमेदवार असणार आहे. कारण नुकतेच झालेल्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीतून प्राजक्त तनपुरे यांनी माघार घेतली होती. त्यामुळे भाजपचे अक्षय कर्डिले सहज निवडून आले आहेत. त्यामुळे प्राजक्त तनपुरे यांना पक्षात घेऊन उद्या भाजप उमेदवारी जाहीर करू शकते. तसे भाजपमध्ये उमेदवारीसाठी जास्त रस्सीखेच दिसून येत नाही. देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष सत्यजित कदम हेही भाजपकडून इच्छुक आहेत. ते भाजपच्या नेत्यांना भेटत आहे.

पुणे दारू प्रकरणानंतर रोहित पवारांची मनसे स्टाईल; हडपसरमध्ये दारूचे अड्डे फोडले


काँग्रेसकडून करण ससाणे पण मदत मिळणार का ?

काँग्रेसकडून इच्छुकांची संख्या फार नाही. माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे रिंगणात उतरतील, अशी राजकीय चर्चा होती. परंतु ते निवडणूक लढणार नाहीत. त्यामुळे काँग्रेसकडून करण ससाणे यांचे नाव आघाडीवर आहे. त्यामुळे त्यांचे नाव निश्चित मानले जात आहे. संगमनेरची नगरपालिका ही आमदार सत्यजित तांबे यांच्या ताब्यात आहे. त्यांची पत्नी डॉ. मैथिली तांबे या नगराध्यक्ष आहेत. त्यामुळे या निवडणुकीत तांबे यांचा पाठिंबा कोणाला राहिल हेही महत्त्वाचे राहिल. तर माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्याकडे नेवासा नगरपालिकेचे काही सदस्य आहेत. त्यामुळे तेही कोणाला साथ देतात हे महत्त्वाचे असणार आहे.


संख्याबळ कोणाकडे किती ?

अहिल्यानगरमध्ये विधानपरिषदेसाठी 461 मतदार आहेत. भाजपकडे सर्वाधिक 199, राष्ट्रवादी काँग्रेसकडे (सुनेत्रा पवार) 50 व शिवसेना शिंदेगटाकडे 48 मते आहेत. तर महाविकास आघाडीत काँग्रेसकडे 29, राष्ट्रवादी काँग्रेसकडे 35 मते आहेत. इतर 100 सदस्य आहेत. त्यामुळे करण ससाणेंसाठी ही निवडणूक अवघड आहे. तर भाजपसाठी ही निवडणूक सोपी आहे. परंतु ही निवडणूक वेगळ्या पातळीवर लढती जात असते.

Exit mobile version