मोठी बातमी! मी उपोषण करणारच, तुम्ही निघा; शिंदे समितीच्या नोंदींवरून संतप्त जरांगेंचा निर्धार कायम

Manoj Jarange Determination remains for Hunger Strike for Maratha Reservation संतप्त जरांगेंचा निर्धार कायम

Manoj Jarange Determination Remains For Hunger Strike For Maratha Reservation

Manoj Jarange Determination remains for Hunger Strike for Maratha Reservation after meeting with Minister Vikhe : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन छेडणारे मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेत मोठी घोषणा केली आहे. येत्या 30 मे पासून आपण कडक आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा जरांगेंनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांनी त्यांना उपोषण मागे घेण्याचं आवाहन केलं. मात्र जरांगे हे मराठा समाजाच्या शिंदे समितीच्या कुणबी नोंदींवरून संतप्त होत त्यांनी उपोषणाचा निर्धार कायम ठेवला आहे.

नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे?

आमच्या आंदोकनापासून राज्यात किती नोंदी सापडल्या? 57 लाख 41 हजार नोंदी सापडल्याचा रेकॉर्ड सरकारने आम्हाला दिलेला आहे. शिंदे समितीने शोधल्या त्याच नोंदीच्या आकड्यांमध्ये फरक आहे. तसेच सरकार सांगताना नोंदींचा आकडा एक सांगत. आणि कागदोपत्री वेगळचं असतं. त्यामुळे अधिकारी कुणबी प्रमाणपत्र देत नाहीत. फक्त गोंधळ निर्माण होत आहे. त्यामुळेमी उपोषण करणार, तुमचं माझं जमणार नाही.

आता कागदी नोटा विसरा, पाकिटात येणार ‘पॉलीमर’ नोटांचं बंडल?; RBI मोठ्या निर्णयाच्या विचारात

ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र निघाले त्यांच्या व्हॅलीडिटी द्या, अधिकारी प्रमाणपत्र देखील देत नाही. प्रस्ताव तयार आहे. हैद्राबाद गॅझेटचा मुद्दा सुप्रीम कोर्टात गेले आहे.याबाबतचा निर्णय अजून आलेला नाही.त्यामुळे सातारा गॅझेट अजून लागू करू शकलो नाही. लाड तुम्ही राजीनामा देऊ नका फक्त माझ्यासोबत उपोषणाला बसा. महाविकास आघाडीने धोका दिला म्हणून तुम्हाला निवडून दिले आता तुम्ही आरक्षण द्या. 10 महिन्यात सरकारने आमच्या कोणत्याही मागण्या पूर्ण केल्या नाहीत. उलट मुख्यमंत्री कार्यालयाने प्रमाणपत्रे वाटप थांबवले. फडणवीस यांना विरोध करण्याची हिंमत कुणाची? एकदा मराठ्यांना आरक्षण देऊन बघा. आता यंदा 50-60 लाख पोरांचे अँड मिशन अडकतील. तुम्हाला मी आरक्षण शिकवतो. लाड आणि मी दोघांनी कुस्ती केलेली आहे. मी त्यांना 25 वेळा धुवून काढला.

विधानपरिषद निवडणूक : अहिल्यानगरची लढत फिक्स; प्राजक्त तनपुरे विरुद्ध करण ससाणे भिडणार ?

1994,चा जीआर, आणि मंडल आयोग चॅलेंज होऊ शकतो. इंदिरा साहनी जजमेंटमुळे अनेक अडचणी आहेत. सातारा संस्थानचा जीआर काढा.फडणवीस यांनी आदेश दिल्यास उद्यापासूनच हैदराबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्र वाटप सुरु होतील. एका महिन्यात हैद्राबाद गॅझेटनुसार जात प्रमाणपत्र सगळ्यांना देणार हे फडणवीसांनी लेखी द्यावे. आमच्यावरील गुन्हे मागे घेऊ नका, पण आम्हाला मारहाण करणाऱ्या दीडशे पोलिसांवर गुन्हे दाखल करा, चालू द्या प्रकरण कोर्टात.

मोठी बातमी! मी उपोषण करणारच, तुम्ही निघा; शिंदे समितीच्या नोंदींवरून संतप्त जरांगेंचा निर्धार कायम

हैदराबाद गॅझेट नुसार 58 लाख नोंदीच्या प्रमाणपत्रे व्हॅलिडीटी थांबणार नाही असे आदेश दिल्याचे लेखी पत्र द्या. सातारा संस्थानच्या गॅझेटचा जीआर काढा. मराठा आंदोलकांवरील गुन्हे आणि कलमा कमी करा. मराठा-कुणबी मंत्रालय स्थापन करा. सारथीच्या सर्व योजना सुरू करा. महामंडळाचे परतावे द्या. शिंदे समितीला एक वर्षाची मुदतवाढ देऊन समितीला मनुष्यबळ द्या. आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या आंदोलकांच्या वारसदाराला महावितरण आणि उद्योगातील नियुक्त्या द्या.

follow us