Vidhan Parishad Election Live Updates : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान पार पडले. त्यानंतर आता या निवडणुकीचे निकाल हाती आले असून, लोकसभेनंतर महायुतीने जोरदार कमबॅक केल्याचे पाहण्यास मिळत आहे. महायुतीने विधानपरिषदेसाठी मैदानात उतरवलेले सर्वच्या सर्व 9 उमेदवार विजयी झाले आहेत. त्यानंतर, ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकरही विजयी झाले आहेत. शेकापचे जयंत पाटील यांना केवळ 12 मते आहे. त्यामुळे नार्वेकारांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे.
मैदानात कोण कोण?
भाजपचे उमेदवार : पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, अमित गोरखे, योगेश टिळेकर
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) : शिवाजीराव गर्जे, राजेश विटेकर
शिवसेना (शिंदे गट) : कृपाल तुमाने, भावना गवळी
शिवसेना (उबाठा) : मिलिंद नार्वेकर
शरद पवार गट पुरस्कृत उमेदवार : जयंत पाटील (शेकाप)
काँग्रेस : प्रज्ञा सातव